मुंबई

निसर्गाचं रौद्ररुप! गेल्या दोन महिन्यांत कोसळली तब्बल 'इतकी' हजार झाडं

पूजा विचारे

मुंबईः गेले तीन ते चार दिवस मुंबई शहर आणि उपनगरात पावसानं चांगलाच जोर धरला. याकाळात शहरात झाडं कोसळण्याच्या घटना जास्त वाढत असल्याचं समोर आलं आहे. यंदाच्या पावसाळ्यात तब्बल १ हजार ८६६ झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. केवळ १ जून ते ७ ऑगस्टपर्यंत या घटना घडल्याचं समोर येतंय. या घटनांमध्ये तीन नागरिक जखमी झालेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात म्हणजेच केवळ दोन दिवसात मुंबईत तब्बल ३६१ ठिकाणी झाडे कोसळली. आतापर्यंत दोन महिन्यात शहर भागात ५०८, पूर्व उपनगरात ४१३ तर सर्वाधिक पश्चिम उपनगरात ९४७ ठिकाणी झाडे कोसळली. म्हणजेच दररोज २७ ते २८ ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी झाडे तसंच फांद्या पडण्याच्या घटना घडत असतात. या घटनांमध्ये जीवितहानी देखील होत असते. बरेच नागरिक जखमी सुद्धा होतात. यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात निसर्ग वादळाचा मोठा तडाखा मुंबई शहराला बसला. या वादळात एकाच दिवसात तब्बल १९६ ठिकाणी झाडे, फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

४ जूनला ७५ ठिकाणी, १८ जूनला १८ ठिकाणी, ५ जुलैला ७५ अशा वाढत्या संख्येने दोन महिन्यांत एकूण एक हजार ८६६ ठिकाणी झाडे कोसळण्याचा घटना घडल्या. ५ आणि ६ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे २४ तासात ३६१ ठिकाणी झाडे पडण्याचा घटना घडल्या. त्यात शहरात २७४, पश्चिम उपनगर ४७ तर पूर्व उपनगरात ४० ठिकाणी झाडे पडली आहे. अनेक भागांत वाहनांचे आणि मालमत्तांचे मोठे नुकसान झाल्याची माहितीही समोर आली आहे. 

तब्बल ५०० झाडं तोडण्यास महापालिकेची परवानगी 

मुंबई महापालिका शहरातील तब्बल ५०० झाडं तोडणार आहेत. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं (Tree Authority (TA)) जवळपास ५०० झाडं तोडण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. तसंच विविध प्रकल्पांसाठी संपूर्ण शहरात ३५६ वृक्षारोपण करण्यात येणार आहे. बुधवारी  ५ ऑगस्टला झालेल्या एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान हा निर्णय घेण्यात आला. मुंबईत जेव्हा शहरात जवळपास ३००  मिलिमीटर पाऊस पडला.  जोगेश्वरी ते राममंदिर स्टेशनचा पूल बांधण्यासाठी आणि कांजूरमार्ग येथे अग्निशमन केंद्र बांधणं या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे.

Mumbai last two month 1866 trees collapse rainy days this year

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

Stock Market: शेअर बाजारात तेजी कधी येणार? मोतीलाल ओसवालने सांगितले बाजाराचे भविष्य

Big Updates: विराट कोहली, लोकेश राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

कधी स्पॉटबॉयचं काम तर कधी अभिनेत्रींचे कपडे इस्त्री केले ; बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीचा डोळ्यात पाणी आणणारा स्ट्रगल

SCROLL FOR NEXT