Mumbai sakal
मुंबई

Mumbai : कल्याण पूर्व, डोंबिवलीतील नेते केवळ स्टेजवर मिरविणारे,शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख रवी पाटील आपल्याच पदाधिकाऱ्यांवर भडकले

शर्मिला वाळुंज

Mumbai - कल्याण येथे शनिवारी शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा पार पडला. या मेळाव्याची लाज कल्याण पश्चिमेतील शिवसैनिकांनी राखली. कल्याण पूर्व आणि डोंबिवलीचे शिवसेनेचे नेते केवळ स्वत:चीच टिमकी वाजवून स्टेजवर मिरवतात असे खडे बोल शिंदे गटाचे कल्याण पश्चिमेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना सुनावले आहेत.

आपल्या या वाक्यावर नंतर त्यांनी सारवासारव केली असली तरी पक्षातील अंतर्गत धुसफूस देखील आता चव्हाट्यावर येते का याची चर्चा रंगू लागली आहे.

कल्याण पश्चिमेत रविवारी सकाळी बिर्ला कॉलेज परिसरात पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त महिला भगिनींना कचरा डब्बा व साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक संजय पाटील, अरविंद मोरे, छाया वाघमारे, नेत्रा उगले, मोहन उगले, श्रेयस समेळ आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमान दरम्यान शहर प्रमुख रवी पाटील यांनी मेळाव्या विषयी सांगताना शिंदे गटातील कल्याण पूर्व आणि डोंबिवलीतील नेत्यांवर ताशेरे ओढले. रवी पाटील यांनी सांगितले की, दोन हजार लोकांचा मेळावा घेण्याचा आदेश आला. 24 तासात लोक जमवा असे सांगण्यात आले. 24 तासात कोणत्याही नेत्याला लोक जमविणे शक्य नाही.

कल्याण आणि भिवंडी लोकसभा मेळावा होता. मी म्हटले पाच हजार लोक जमले पाहिजे अशी मनस्थिती होती. कालच्या मेळावा कल्याण पश्चिमेतील 1200 ते 1500 लोक आले. मी स्वत: गेटवर उभा होता. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडीचे नगरसेवक सोडले तर एकही माणूस आला नाही.

उगाच येऊन टिमक्या वाजवायच्या. म्हणजे महेश गायकवाड असतील मल्लेश शेट्टी असतील. जे कोणी असतील. डोंबिवलीचे कोणी दिसले नाही. स्टेजवर मिरविणारे असतात. नेत्याना दाखविण्यासाठी स्टेजवर मिरवायचे. आपल्या लोकांविषयी बाेलले नाही पाहिजे. पण फक्त कल्याण पश्चिमेतील लोकांनी मेळाव्याची लाज वाचविली असे कार्यकर्त्यांना उद्देशून बोलले.

कार्यक्रमानंतर मात्र या प्रकरणावर शहर प्रमुख पाटील यांनी आपल्याच वक्तव्यावर सारवासारव केली. रवी म्हणाले, ज्या शहरात मेळावा असतो. त्या शहरातील लोक जास्त येतात. कल्याण पूर्वेला लोकग्राम पादचारी पूलाचे भूमीपूजन होते.

त्यामुळे त्याठिकाणी कार्यकर्ते व्यस्त होते. तसेच कमी वेळेत मेळाव्याची सूचना दिली गेली होती असे म्हणत स्वतःची बाजू सावरून नेली. मात्र भाषणात त्यांनी आपल्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले असल्याने शिंदे गटातील अंतर्गत वाद ही अट चव्हाट्यावर येतो का याविषयीची चर्चा राजकिय वर्तुळात रंगू लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mukesh Ambani: मुकेश अंबानींना टक्कर देणार भरतिया समूह; कोका-कोलामधील 40 टक्के हिस्सा खरेदी करणार

Khandesh News: भाजपच्या पहिल्या यादीत खानदेशातील 10 उमेदवार! विद्यमान आमदारांची उमेदवारी कायम; रावेर, धुळ्याला नव्या चेहऱ्याना संधी

Vidhansbha Election : महाविकास आघाडीचं ठरेना… अजूनही १७ जागांवर तिढा कायम; फायनल यादी कधी येणार?

सुंदर विषय तरीही चित्रपटांकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ; प्रियांकाच्या 'पाणी'ने २ दिवसात किती केली कमाई?

Ranji Trophy: 15 Sixes! जम्मू-काश्मीरच्या अब्दुल समदने एकाच सामन्यात ठोकल्या दोन सेंच्युरी, मोठ्या विक्रमालाही गवसणी

SCROLL FOR NEXT