मुंबई

Mumbai Local Accident: पाय घसरून हात निसटला, फलाटाच्या गॅप मध्ये अडकली अन्..

सकाळ डिजिटल टीम

Latest Dombivali News: जलद लोकल पकडताना दरवाजा मधील लोखंडी दांडक्यावरून हात सटकल्याने एक महिला फलाट आणि लोकलच्या गॅप मध्ये जाऊन अडकली. लोकलमधील प्रवाशांनी त्वरित आरडाओरडा करत लोकल थांबवून ठेवण्याची विनंती केली. रेल्वे कर्मचारी, सुरक्षा जवान, लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होत महिलेला सुखरूप बाहेर काढले. मानसी किर (वय 24) असे महिला प्रवाशाचे नाव आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस ही घटना घडली सकाळी 8.50 वाजताची कल्याणहून सीएसएमटीकडे निघालेली 15 डब्यांची जलद लोकल फलाट क्रमांक 5 वर आली होती. नेहमी प्रमाणे प्रवाशांची लोकल पकडण्यासाठी तुफान गर्दी होती.

कार्यालयात जाण्यास उशीर नको म्हणून जो तो गाडी पकडण्यासाठी धडपडत होता. दरम्यान मानसी हीने लोकल मध्ये चढण्यासाठी दारातील ल9लोखंडी खांब पकडला. मात्र पाय घसरल्याने तिचा खांबावरील हात निसटला. आणि लोकल व फलाटामधील गॅप मध्ये ती जाऊन अडकली.

मानसी पडताच प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. प्रवाशांनी मोटारमनला गाडी थांबवून ठेवण्याची विनंती केली. प्रवाशांचा ओरडा एकून रेल्वे सुरक्षा जवान, रेल्वे पोलीस घटनास्थळी आले. लोकल मधील महिलांनी देखील डब्यातून बाहेर पडत डब्यातील भार हलका करत महिलेला बाहेर काढण्यासाठी हात दिला.

डोंबिवली रेल्वे स्थानकाचे उप स्थानक अधिकारी अनिमेश कुमार, रेल्वे सुरक्षा बलाचे भावना सिंग, लोहमार्ग हवालदार गाईखे, पाॅईन्टमन मिथून गायकवाड, प्रभाकर ठाकरे आणि प्रवासी कार्तिक सिंग आणि इतर प्रवाशांनी महिलेला सुखरूप बाहेर काढले. महिलेला बाहेर काढल्यानंतर लोकल पुढे रवाना करण्यात आली. त्यानंतर लोकलसेवा सुरळीत सुरू झाली.

सदर महिला प्रवाशाला उपस्थितांनी धीर दिला. तिच्या कुटुंबीयांना ही माहिती देण्यात आली. महिला सुस्थितीत असल्याची खात्री पटल्यावर तिला रेल्वे सुरक्षा जवानांनी तिच्या घरी पोहचविण्याची व्यवस्था केली. तिला रुग्णालयात नेण्याची व्यवस्था रेल्वे जवानांनी केली होती. परंतु, तिने आपण सुस्थितीत असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AFG vs SA 1st ODI : ७ बाद ३६ धावा; अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी आफ्रिकेची लावली वाट, ३३.३ षटकांत पूर्ण संघ तंबूत

Pune Metro: पुणेकरांचं मेट्रोप्रेम! गणेशोत्सवाच्या दहा दिवसात २० लाखांपेक्षा जास्त जणांनी केला प्रवास; विसर्जनाच्या २४ तासात रेकॉर्ड ब्रेक

डीपीने टाकलं सुरजला मागे अन्... बिग बॉसच्या घरातील सगळ्यात लोकप्रिय स्पर्धक कोण? वाचा कोण कुठल्या स्थानावर

Office Toxic Management : वर्क लोडमुळे करून नका मेंदूचा कचरा, असे करा ऑफिसमधील टॉक्सिक वातावरणाशी दोन हात

Latest Maharashtra News Live Updates: कोलकात्यात भाजपचा निषेध मोर्चा

SCROLL FOR NEXT