Mumbai Local news Central Railway Mega Block today local cancel Know in detail 
मुंबई

Mumbai Local Breaking : मुंबईकरांना मोठा दिलासा ; गणेश उत्सवानिमित्त रविवारचा मेगा ब्लॉक रद्द

Mumbai Local Breaking : कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या / अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील

Chinmay Jagtap

Mumbai Local Breaking : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शेवटचा रविवार असल्याने मध्य रेल्वेने हार्बर, ट्रान्सहार्बरवर घेण्यात येणारा ब्लॉक रद्द केला आहे. फक्त मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

त्यामुळे खरेदीसाठी जाऊ इच्छिणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्‍चिम रेल्वेवरही या दिवशी मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीकरिता १७ सप्टेंबरला मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रान्सहार्बर आणि हार्बर लाईनवर ब्लॉक घेण्यात येणार नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळेल.

मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुरुस्ती करण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत मुलुंडहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील. तसेच गंतव्य स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या / अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील व गंतव्य स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

मध्य रेल्वेवर प्रवाशांना मनस्ताप

तर दुसरीकडे, मध्य रेल्वेवरील जलद लोकल गाड्या शुक्रवारी विलंबाने धावत होत्या. विशेष म्हणजे, लांब पल्ल्याच्या गाड्यांना मार्गिका उपलब्ध करून दिल्या असल्याने सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सेवा २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. मुंबईत येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या उशिरा येत असल्याने त्या गाड्यांना जलद मार्गिका उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जलद लोकल सेवांचा वेळापत्रकावर परिणाम होत आहे. शुक्रवारी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अप जलद लोकल सेवा दुपारी १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला.

वाशी रेल्वेस्थानकात सिग्नल बिघाड

वाशी रेल्वेस्थानकात सिग्नल बिघाडामुळे शुक्रवारी (ता.१५) सायंकाळी लोकल सेवा विस्कळित झाली होती. ही घटना ऐन गर्दीचा वेळी घडल्याने कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना लेटमार्क लागला आहे. शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास वाशी रेल्वेस्थानकातील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सीएसएमटी ते पनवेल अप-डाऊन दिशेने जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल सेवा आणि ठाणे ते पनवेल अप-डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी लोकलच्या एकामागोमाग एक रांगा लागल्याने गाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रवासी अडकून पडले होते. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या १६ मिनिटांत हा बिघाड दुरुस्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT