Ticket Checking 
मुंबई

सावधान! मुंबई लोकलमध्ये बनावट ओळखपत्र घेऊन चुकूनही जाऊ नका अन्यथा...

पहिल्या लॉकडाउनमध्ये काहींनी बनावट ओळखपत्राचा आधार घेत केला होता लोकल प्रवास

कुलदीप घायवट

मुंबई: सर्वसामान्य प्रवाशांना ठराविक वेळेत 1 फेब्रुवारीपासून लोकल प्रवास करण्यास मुभा मिळाली होती. पण आता मुख्यमंत्र्यांनी १५ एप्रिलपासून पुढील १५ दिवस निर्बंध लागू केल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वे प्रवासाची परवानगी आहे. सर्वसामान्य प्रवाशांचा लोकल प्रवास बंदच झाला आहे. अशा परिस्थितीत लोकांकडील ओळखपत्र हाच त्यांच्या प्रवासाचा परवान असल्यामुळे अनेक ठिकाणी बनावट ओळखपत्र बनविणाऱ्यांचा पुन्हा सुळसुळाट वाढण्याची शक्यता आहे. गेल्या लॉकडाउनमध्ये हा प्रकार समोर आला होता, त्यामुळे या लॉकडाउनमध्ये तसे बनावट ओळखपत्र बनविणाऱ्यांवर आणि बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई सुरू करण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. लोकलमधून बनावट ओळखपत्र घेऊन फिरणाऱ्यांना पकडण्यासाठी लोकलमध्ये विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे.

बनावट ओळखपत्र घेऊन फिरणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. स्थानकावर एकूण 300 चा फौजफाटा वाढविण्यात येणार आहे. यासह रेल्वे सुरक्षा बल, वाणिज्य विभाग, तिकिट तपासनीस यांच्याद्वारे बनावट ओळखपत्र घेऊन प्रवाशांना पकडण्यात येणार आहे. यासह बनावट ओळखपत्र घेऊन फिरणाऱ्या पकडण्यासाठी लोकलमध्ये विशेष पथक फिरणार आहे.

- जितेंद्र श्रीवास्तव, विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे

उपनगरीय रेल्वे मार्गावरून लॉकडाऊन आणि अनलॉक काळात फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवास करण्यास परवानगी होती. यावेळी बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह, बनावट ओळखपत्र तयार करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. ऑगस्ट 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत उपनगरीय रेल्वे मार्गावर 22 गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांना ठराविक वेळेत लोकल प्रवास खुला केल्यावर मागील दोन महिन्यात एकही गुन्ह्यांची नोंद नसल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, लॉकडाऊन आणि लोकल प्रवासाबाबत निर्बंध लागल्यामुळे पुन्हा बनावट ओळखपत्र तयार करण्याचा सुळसुळाट वाढणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

15 जूनपासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती. यावेळी 31 जानेवारी 2021 पर्यंत सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास सुरू केला नव्हता. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत, कसारा येथून प्रवास करणाऱ्या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रस्ते प्रवास करताना बराच मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे त्यांच्याकडून छुप्या पद्धतीने लोकल प्रवास केला जात होता. यासाठी काहींनी बनावट ओळखपत्राचा आधार घेतला. परंतु अशा प्रवाशांची रेल्वे तिकीट तपासनीस, रेल्वे पोलिसांकडून धरपकड करण्यात येत आहे. स्थानकात प्रवेशाआधी तिकीट, ओळखपत्राची तपासणी करतानाच बनावट ओळखपत्र बाळगल्याचे दिसताच त्यांना पकडण्यात आले. यामध्ये सर्वाधिक बनावट ओळखपत्र महापालिकेचे होते. सुमारे 80 टक्के बनावट ओळखपत्र बृन्हमुंबई महापालिकेची पकडण्यात आली, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. तसेच अन्य पालिका, भारतीय रेल्वेचे, पोलिसांचे, विविध रुग्णालयांच्या नावाने बनावट ओळखपत्रही यावेळी पकडण्यात आले. बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणाऱ्यांमध्ये खासगी कार्यालयात काम करणारे कर्मचारी, बांधकाम व्यवसायातील कामगार, घरकाम करणाऱ्या महिला यांचा समावेश होता.

बनावट ओळखपत्रांबाबत ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक गुन्हे दाखल

दादर, अंधेरी आणि वसई रोड येथील रेल्वे पोलीस ठाण्यात आतापर्यंत प्रत्येकी 3 बनावट ओळखपत्र बनविणाऱ्यांचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. काही गुन्हेगारांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुर्ला, वडाळा, बोरीवली, सीएसएमटी, मुंबई सेंट्रल येथील रेल्वे पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन, तर, वाशी, ठाणे, कल्याण येथील रेल्वे पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा एकूण 22 ओळखपत्र बनविणाऱ्यांचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. ऑगस्ट महिन्यात एकूण 6 गुन्हे दाखल झाले. त्यानंतर सप्टेंबर, नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी दोन, डिसेंबरमध्ये एक आणि जानेवारी महिन्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, ऑक्टोबर महिन्यात उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे पोलीस ठाण्यात तब्बल 8 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT