Mumbai Local News sakal
मुंबई

Mumbai Local: हुश्श... पश्मिम रेल्वेचे काम अंतिम टप्यात ; सर्वसामान्यांचे हाल होणार कमी

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local: पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी सुरू असलेला ब्लॉक आता अंतिम टप्प्यात आला आहे. गेले आठवडाभर लोकल रद्द झाल्याने वेठिस धरलेल्या प्रवाशांना शेवटचे दोन दिवस आणखी त्रास सहन करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेवर आज ९३ लोकल फेऱ्या रद्द असणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर २९ दिवसांचा ब्लॉक घेऊन पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू केले आहे. यादरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द केल्या आहे. प्रवाशांची होणारी कोंडी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने रद्द केलेल्या ३१६ लोकल सेवा पूर्ववत करण्यावर भर दिला आहे. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी रद्द केलेल्या काही लोकल पूर्ववत केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर शनिवारी ९३ लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दोन दिवसांचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची पाहणी रेल्वे सुरक्षा आयुक्त ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी करणार आहेत. या पाहणीनंतरच सहावी मार्गिका सुरू करण्याचा निर्णय होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Najib Mulla: दिल्लीतील पत्रकाराला राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण; मुंब्रा पोलिसांत गुन्हा दाखल

दीपिका- रणवीरने शेअर केला लेकीचा पहिला फोटो; नावही सांगितलं, छोटंसं पण अर्थपूर्ण नाव वाचून नेटकरी करतायत कौतुक

BJP Oldest Member Dies: भाजपच्या सर्वात जुन्या कार्यकर्त्याचं निधन! PM मोदी, अमित शहांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले...

राज्य मंत्रिमंडळाच्या संपत्तीत लक्षणीय वाढ; जाणून घ्या कोणत्या मंत्र्याची मालमत्ता किती वाढली?

Sports Bulletin 1st November : भारताला फिरकीपटूंची साथ,पण फलंदाजांनी केला घात ते आयपीएल संदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT