Mumbai Local: उन्हाळात उकाळ्यापासून बचावासाठी आता पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी आपला मोर्चा एसी लोकल कडे वळविला आहे. सोमवार (ता.०६) पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमधून तब्बल २ लाख ४७ हजार २२३ प्रवाशांनी प्रवास केला.तर मध्य रेल्वेवर १ लाख ४० हजार प्रवाशांनी गारेगार आल्हाददायक प्रवास केला आहे. तर, गेल्या वर्षाची यंदा वातानुकूलित लोकलचे प्रवासी संख्या ३७ टक्क्यांनी वाढल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मुंबईत दमट हवामान त्यातच उन्हाळ्या आला कि लोकलच्या प्रवास नकोस वाटतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी मुंबईतील एसी लोकलकडे धावत घेतात. पश्चिम रेल्वेवर सध्या दिवसाला ७ एसी लोकलच्या ९६ फेऱ्या चालविण्यात येतात.
मध्य रेल्वेवर ५ एसी लोकल गाड्यांचा ६६ फेऱ्या चालविण्यात येतात.१ मे ते ६ मे या सहा दिवसांच्या कालावधीत पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलमधून ९ लाख १६ हजार ०९३ प्रवाशांनी प्रवास केला आहे. शनिवार आणि रविवारी पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या ५३ फेऱ्या चालविण्यात येतात.
४ मे रोजी ७५ हजार १५४ आणि ५ मे रोजी १ लाख ११ हजार ६२० प्रवाशांनी प्रवास केला. उन्हाचा तडाका वाढत चालल्याने एसी लोकलचा पास काढण्याचे प्रमाणही वाढले आहे. ३ हजार ७३७ प्रवाशांनी सोमवारी ६ मे रोजी पास काढला आहे. तर दरदिवशी तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारण २८ हजार २७९ आहे.
मध्य रेल्वेवरही एसी लोकलची प्रवासी संख्या वाढते आहे.गेल्या वर्षी ६ मे रोजी केवळ २६ हजार ८३४ प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला होता. यंदाच्या ६ मे रोजी तब्बल १लाख ४० हजार ९४४ प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.