Mumbai Local Sakal
मुंबई

Mumbai Local News: तांत्रिक ब्लॉकमुळे लोकलच्या फेऱ्या रद्द; गर्दीमुळे प्रवाशांचे हाल!

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local News : ऑक्टोबर हिट आणि उष्णतेत होणाऱ्या बदलांचा रेल्वे रुळावर परिणाम होत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मध्य रेल्वेने सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. १९) माटुंगा ते सायन, घाटकोपर ते विक्रोळी आणि वाशी ते मानखुर्द स्थानकांवर वीस मिनिटांचा तांत्रिक ब्लॉक घेतला. परिणामी आठ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने प्रवाशांचे हाल झाले.

तापमानात सातत्याने बदल होत असल्याने त्याचा परिणाम चक्क रेल्वे रुळावर होत आहे. सातत्याने बदलणाऱ्या तापमानामुळे रुळांच्या आकुंचन आणि प्रसरण प्रक्रियेचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे रुळांच्या स्थितीत बदल होत असल्याने ते धोकादायक ठरू शकते. खबरदारी म्हणून मध्य रेल्वेने गुरुवारी घाटकोपर ते विक्रोळीदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर दुपारी १.५० ते २.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला. माटुंगा ते सायन अप जलद मार्गावरही दुपारी १.४५ ते २.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला.

त्याशिवाय हार्बर मार्गावर वाशी ते मानखुर्ददरम्यान दुपारी १.०२ ते २.२० वाजेपर्यंत १८ मिनिटांचा ब्लॉक घेण्यात आला. परिणामी दुपारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवांचे वेळापत्रक विस्कळित झाले होते. त्यामुळे रेल्वेस्थानकांवर आणि लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. मुख्य मार्गावरील सहा लोकल फेऱ्या मध्य रेल्वेला रद्द कराव्या लागल्या. हार्बर मार्गावरील दोन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT