उपनगरीय रेल्वे मार्गांवर रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, ३० एप्रिल रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर; तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते जोगेश्वरीदरम्यान पाचव्या मार्गिकेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा ते मुलुंड, अप-डाऊन जलद मार्ग
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर धावतील. ठाण्याच्या पुढे या लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवून त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.
हार्बर रेल्वे
कुठे : सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे, अप-डाऊन मार्ग
कधी : ११.१० ते ४.४०
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी/वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेलकरीता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल आणि वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द राहणार आहेत; तर पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल बंद राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्र. ८) दरम्यान विशेष लोकल २० मिनिटांच्या अंतराने चालवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे
कुठे : सांताक्रूझ ते जोगेश्वरी, पाचवी मार्गिका
कधी : सकाळी १० ते दुपारी ३
परिणाम : ब्लॉकदरम्यान काही लोकल सेवा रद्द असणार आहेत. तसेच पाचव्या मार्गिकेवर सांताक्रूज ते जोगेश्वरी स्थानकांदरम्यान ब्लॉकमुळे मेल-एक्सप्रेस आणि लोकल सेवांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.