Mumbai Local New mega block sakal
मुंबई

Mumbai Local News: तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. १२) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाउन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० पर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.

ठाण्याच्या पुढे या लोकल जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

हार्बर रेल्वे
कुठे : कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत वाशी, बेलापूर, पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/ पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.

प्रवाशांच्या सोईसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल आणि वाशीदरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. याशिवाय हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करू शकतील.

पश्चिम रेल्वे
कुठे : सांताक्रूझ-गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
वेळ : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत


परिणाम : ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालविण्यात येतील. विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकांत लोकल थांबणार नाहीत. तसेच ब्लॉक काळात काही लोकल रद्द केलेल्या असून काही लोकल बोरिवली-अंधेरी लोकल हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकांपर्यंत चालविण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT