Mumbai Local News:  sakal
मुंबई

Mumbai Local News: तीन दिवसांचा मेगाब्लॉक मागे घ्या, राष्ट्रवादी काँग्रेसची रेल्वेकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

Ghatkopar News: मुंबईची लाईफ लाईन असलेल्या मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवसांचा मेगाब्लॉक लागल्याने मुंबईकरांचे हाल होणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे.

यामुळे उपनगरीय मार्गावरील 930 फेरी रद्द होणार असल्याने 33 लाख प्रवाशांचे या मेगाब्लॉकमुले हाल होणार आहेत. मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात आणि ब्लॉक मागे घ्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले.

ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने 30/31 मे च्या मध्यरात्रीपासून ते 2 जून पर्यंत 63 तासांचा विशेष मेगाब्लॉक जाहीर केला आहे. तसेच सीएसएमटी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी 30/31 मे च्या मध्यरात्री ते 2 जून च्या दुपारपर्यंत 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील 930 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे.

याचा फटका या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या तब्बल 33 लाख प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना एक आठवडा पूर्वसूचना देणे अपेक्षित होते. मात्र ब्लॉक सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर ब्लॉकची घोषणा केल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.

मध्य रेल्वेच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ऍड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन करत मेगाब्लॉक मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

या आहेत मागण्या

मेगाब्लॉक घेण्यापूर्वी किमान सात दिवस अगोदर रेल्वे प्रवाशांना सूचना देण्यात यावी, बेस्ट, एसटी बसची पर्यायी व्यवस्था करावी, मासिक पास धारक आणि मेल गाड्यांचे पूर्व बुकिंग असलेल्या प्रवाशांसाठी मोफत व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या युवक काँग्रेसने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांच्याकडे केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग! सर्वाधिक पावसाची नोंद, जाणून घ्या कोणत्या परिसरात किती कोसळला?

Pune Rain: पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर

Rain News: धो धो पावसामुळे टॅक्सीवाले मालामाल; अतिरिक्त भाडे आकारत चाकरमान्यांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

Mumbai Rain: मुंबईत परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली

Changes in Transportation : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त असे असतील शहरातील वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT