Mumbai Local Accident sakal
मुंबई

Mumbai Local: कल्याणच्या प्रवाशाचा रेल्वेत चढताना तोल गेल्याने ठाण्यात मृत्यू!

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Kalyan Railway Sation: ठाणे रेल्वे स्थानकात अमरावती एक्सप्रेस पकडताना तोल जाऊन पडल्याने कल्याण येथील वास्तुविशारद अफजल फकीरा शेख (वय 45)

हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना कळवा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सोमवारी मुंबई परिसरात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वेला बसला. ठाणे ते मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी कल्याण ते ठाणे आणि कर्जत ते ठाणे दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. गाड्या उशिराने धावत होता. कल्याण पश्चिमेतील दूधनाका परिसरात राहणारे वास्तूविशारद अफजल फकीरा शेख काही महत्वाच्या कामानिमित्त वाशीला जाण्यासाठी निघाले. ते वाशीला गेले. त्याठिकाणी काम आटोपून शेख हे कल्याणच्या घरी येण्यासाठी वाशीहून निघाले. त्यांनी वाशीहून रेल्वे गाडी पकडली. ते ठाणे स्थानकात आले.

ठाणे स्थानकात रात्री 9 च्या दरम्यान अमरावती एक्सप्रेस आली होती. त्यांनी त्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचा तोल गेल्याने ते फलाट आणि गाडीच्या गॅपमध्ये पडले. जखमी झालेल्या शेख यांना उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान शेख यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अपघातीमृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT