Mumbai Local sakal
मुंबई

Mumbai Local: रेल्वे ओलांडणाऱ्या प्रवाशांसाठी डोंबिवली रेल्वे पोलिसांची जनजागृती

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Railway Accidents : मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली रेल्वे स्थानक हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. लोकलमधील गर्दीमुळे रेल्वे रुळावर पडून किंवा रेल्वे रूळ ओलांडताना अनेक प्रवाशांना दिवा ते डोंबिवली स्थानकादरम्यान आपला जीव गमवावा लागला आहे.

रेल्वे रूळ ओलांडणे हा धोका आहे हे माहीत असूनही अनेक प्रवाशी हा धोका पत्करून रेल्वे रूळ ओलांडत असतात. अशा प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी भिंती चित्रे रेखाटली आहेत. यमराजला स्वतःहून निमंत्रण देऊ नका असा संदेश देणारे भित्तीचित्र सध्या रेखाटून रेल्वे पोलीस जनजागृती करत आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली रेल्वे स्थानक हे सर्वाधिक गरजेचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात. रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न देखील या स्थानकातूनच मिळते. डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढत असून प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेने रेल्वेच्या फेऱ्या मात्र कमी पडत आहेत. त्यातच डोंबिवलीतून सुटणाऱ्या रेल्वेची संख्या कमी असल्यामुळे लोकलमध्ये चढताना प्रवाशांची दमछाक होते.

लोकलमधील गर्दीमुळे अनेक डोंबिवलीकर प्रवाशांनी आपले जीव गमावल्याच्या घटना आतापर्यंत घडल्या आहेत. तसेच लोकल पकडण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हे प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ देखील ओलांडताना दिसून येतात. यामुळे देखील अपघात होऊन अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. लोकल पकडण्याच्या गडबडीत अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडताना आजूबाजूने येणाऱ्या लोकलचा अंदाज घेत नाहीत. चाकरमानी, शालेय, महाविद्यालयीन मूल, ज्येष्ठ नागरिक अशा पध्दतीने रूळ ओलांडताना दिसतात.

प्रवाशांनी आपले अनमोल आयुष्य धोक्यात टाकू नये. त्यासोबतच अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमा अंतर्गत प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. रेल्वे रूळ ओलांडू नका अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे. भिंतीवर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना यमराज रेड्यावर बसण्यासाठी बोलावत असल्याचा संदेश या चित्रांमधून देण्यात आला आहे. रेल्वे रूळ ओलांडून नागरिकांनी आपले आयुष्य धोक्यात टाकू नये यासाठी असे संदेश देणारे चित्र काढुन, जनजागृती करण्याचा प्रयत्न लोहमार्ग पोलिसांनी केला आहॆ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

..तरच गोवा-तमनार प्रकल्पाला मंजुरी देणार; मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका, पंतप्रधान मोदींना पाठवलं पत्र

Alia Bhatt : "मी मोबाईलमध्ये पुरावा जपून ठेवलाय" राहामुळे झालं होतं रणबीर-आलियामध्ये भांडण ; लेकीबद्दल बोलताना अभिनेत्री भावूक

Latest Marathi News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाच्या प्रदर्शनाला भेट दिली

Viral: माझा पती दरवर्षी नवीन मुलीसोबत लग्न करतो, ५ वेळा थाटलाय संसार, पहिल्या पत्नीनं फोडलं बिंग

Sachin Pilgaonkar: श्रिया नाही तर 'ही' आहे सचिन-सुप्रिया यांची दत्तक घेतलेली मुलगी; वाचा तिचं पुढे काय झालं?

SCROLL FOR NEXT