Mumbai train sakal media
मुंबई

Mumbai Local Train: कामावर निघालेल्या मुंबईकरांचा खोळंबा! हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड; लोकलची वाहतूक उशीराने

रोहित कणसे

लोकल ट्रेनने प्रवास करत सकाळी घाईने कामावर निघणाऱ्या मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. आज सकाळीच हार्बर मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल गाड्या तब्बल १० मिनिटं उशीराने धावत आहेत.तसेच काही गाड्यां रद्द देखील करण्यात आल्या आहेत.

बुधवारी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. अगदी सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना या बिघाडामुळे अडचणीचा सामना करावा लागला. दरम्यान, रेल्वेकडून लोकलची वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. साम टीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावरून धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रेन रूळावरच बंद पडली. त्यामुळे पनवेलकडून-सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला. या मार्गावरील लोकल सेवा उशीराने सुरू होती. तर काही लोकल फेऱ्या रद्द देखील करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

Will Jacks Video: RCB चा शतकवीर मुंबई इंडियन्सने घेतला अन् आकाश अंबानी बंगळुरूच्या संघमालकांना थँक्यू म्हणून आला

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT