Physical handicap sakal
मुंबई

Yatri App : नेत्रहीन प्रवाशांना ‘यात्री’ ॲपमधील बदलांमुळे गाडीची स्थिती ऐकता येणार

ॲपमधील बदलांमुळे गाडीची स्थिती ऐकता येणार

सकाळ डिजिटल टीम

नितीन बिनेकर

मुंबई - उपनगरीय लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशांची संख्या वाढत असून त्यांचा प्रवास त्रासमुक्त व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासन विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे. आता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने यात्री अॅप अपंगस्नेही करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे अंध प्रवाशांना `यात्री ॲप’मध्ये आपली लोकल कुठे आहे? पुढचा स्टॉप कुठला आहे? हे दुसऱ्यांना विचारण्याची गरज भासणार नाही. या ॲपमधील स्क्रीन रिडिंगमार्फत अंध प्रवाशांना लोकलसंदर्भात संपूर्ण माहिती मिळणार आहे.

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकलच्या दिव्यांगांच्या डब्यामधून दररोज तीन लाखांपेक्षा जास्त दिव्यांग प्रवासी प्रवास करतात. या दिव्यांग प्रवाशांना दररोज रेल्वे प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

रेल्वे प्लॅटफॉर्म गाठणे, लोकल, मेल/एक्स्प्रेसमध्ये चढ-उतार करणे आदी असंख्य अडचणींना तोंड दिव्यांग प्रवाशांना द्यावे लागते. लोकलमध्ये अपंगांसाठी स्वतंत्र डब्याची तरतूद असली तरीही एकूणच अपंगस्नेही वातावरण नसल्याने अडचण होते. ही समस्या संपुष्टात आणण्यासाठी आणि दिव्यांग प्रवाशांचा प्रवास सुलभ आणि सुविधाजन्य करण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली आहे.

सुलभता वाढणार

‘यात्री ॲप’ अंध प्रवाशांसाठी अपडेट करणे सुरू आहे. दिव्यांग प्रवाशांचा यावर अभिप्राय घेतला आहे. त्यांच्या सूचनेनुसार ‘यात्री ॲप’ला स्क्रीन रिडिंगच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या दिव्यांग प्रवासी व्हॉईस कमांडद्वारे मोबाईल हाताळतात. ते गुगल असिस्टंटद्वारे त्यांच्या ट्रेनचे थेट लोकेशन सहज शोधू शकतात. मात्र याला आणखी सुलभ बनविण्याचे काम मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे. दिवाळीपर्यंत अंध प्रवाशांसाठी ‘यात्री’ अपडेट होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’ला दिली आहे.

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग अंध प्रवाशांसाठी आता ‘यात्री ॲप’ला स्क्रीन रिडिंगच्या कक्षात आणणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे यात्री ॲप हे अंध आणि दृष्टिहीन प्रवाशांसाठी सोईचे होणार आहे. स्क्रीन रिडिंगच्या सुविधांमुळे नेत्रहीन प्रवाशांना आपल्या दैनंदिन रेल्वे प्रवासात खूप मदत होणार आहे.

त्यामुळे ‘यात्री ॲप’ला दिव्यांग प्रवाशांसाठी अपडेट्स करण्याचे काम मध्य रेल्वेकडून करण्यात येणार आहे. स्क्रीन रिडिंगमुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्या अंध प्रवाशांना आपली लोकल कुठे आहे, पुढचा स्टॉप कुठला, लोकल कोठे पोहोचली हे आता दुसऱ्यांना विचारण्याची गरज भासणार नाही. तसेच अंध प्रवाशांना लोकल तिकीट आणि पास काढण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे.

दिवाळीपर्यंत होणार अपडेट

१३ जुलै २०२२ पासून मध्य रेल्वेचे ‘यात्री ॲप’ प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले. या ‘यात्री ॲप’वर प्रवाशांना लोकल ट्रेनचे रिअल-टाइम लाईव्ह लोकेशन कळण्यास मदत झाली. या ॲप‍पद्वारे एका टचवर प्रवाशांना ट्रेनचे लाईव्ह अपडेट्स आणि घोषणा, ताजे वेळापत्रक, प्रमुख रेल्वेस्थानकांचे नकाशे आणि त्यातील सुविधांबाबत माहिती मिळत आहे.

मध्य रेल्वेच्या निर्णयाचे स्वागत करतो. त्यामुळे अंध प्रवाशांना रेल्वे प्रवासात चांगली मदत होईल. मात्र, रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावेत, याशिवाय सामान्य प्रवाशांमध्ये जनजागृती करावीत. जेणेकरून दिव्यांग डब्यातील सर्वसामान्य प्रवाशांची घुसखोरी कमी होईल आणि दिव्यांग प्रवाशांना लोकल प्रवास सुखर सुलभ आणि सुरक्षित होईल.

- नितीन गायकवाड, अध्यक्ष, निर्धार विकलांग सामाजिक संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT