Mega block mumbai  Sakal
मुंबई

Mumbai Local Mega Block : लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! हार्बर मार्गावर तब्बल ३८ तासांचा ब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

रोहित कणसे

मुंबईत लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावर तब्बल ३८ तासांचा मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. उद्या म्हणजेच शनिवारी (३० सप्टेंबर) रात्री ११ वाजेपासून ते सोमवारी (२ ऑक्टोबर) दुपारी १ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत बेलापूर ते पनवेल तसेच ट्रान्स हार्बर लाईनवर अप आणि डाऊन मार्गावर एकही ट्रेन धावणार नाहीये. त्यामुळे मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

रेल्वे सेवा कशी सुरू असेल?

लोकलच्या हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा बेलापूर, नेरूळ आणि वाशी स्थानकांपर्यंत असणार आहे. डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या २ नवीन अप आणि डाउन लाईन्सच्या बांधकामासह पनवेल उपनगरीय रीमॉडेलिंगचे काम करण्यात येणार असल्याने रेल्वे सेवा बंद असणार आहे.

हा मेगाब्लॉक सुरू होण्यापूर्वी सीएसएमटीहून पनवेलसाठी शेवटची लोकल रात्री ९ वाजून २ मिनिटांनी सुटणार नाही. ही लोकल ट्रेन रात्री १० वाजून २२ मिनिटांनी पनवेल स्थानकात दाखल होईल. तर अप हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल शनिवारी रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी सुटेल. ही लोकल ११ वाजून ५४ मिनिटांनी CSMT स्थानकात दाखल होईल. यानंतर लोकल सेवा बंद असणार आहे.

तब्बल ३८ तासांचा मेगाब्लॉक संपल्यानंतर २ ऑक्टोबर रोडी सीएसएमटीहून पनवेलसाठी जाणारी पहिली लोकल १२ वाजून ०८ मिनिटांनी सुरू होईल. ही लोकल १ वाजून २९ मिनिटांनी पनवेल स्थानकात पोहचेल. त्याचबरोबर पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल दुपारी १ वाजून ३७ मिनिटांनी सुटेल. ही लोकल २ वाजून ५६ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात दाखल होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group: अदानी 6 हजार कोटींना विकत घेणार 90 वर्षे जुनी कंपनी, काय आहे खास ?

IND vs BAN 1st Test : Jasprit Bumrah चा चेंडू सोडण्याची चूक अन् बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल; रचले गेले ५ मोठे विक्रम

Kashedi Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील एक भुयारी मार्ग आजपासून बंद; काय आहे कारण?

CM Eknath Shinde : "सीएम साहेबांचा दरवाजा बंद ? " मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने चक्क आमदाराला नाकारला प्रवेश !

India Economy : भारत २०३१ पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था; ‘एस अँड पी’चा अहवाल

SCROLL FOR NEXT