Mumbai Local Big decision eSakal
मुंबई

Mumbai Local : मुंबई लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खावे लागणार नाहीत धक्के; मिळणार खास राखीव डबा! प्रवास होणार आरामदायक

यासाठीची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

Sudesh

मुंबई लोकल आणि गर्दी हे समीकरण तर ठरलेलंच आहे. लोकलमध्ये बसायला जागा मिळाली आहे, आणि आरामदायी प्रवास झाला आहे असं अगदी क्वचितच घडतं. या गर्दीमुळे वयोवृद्ध लोकांना लोकलमधून प्रवास करणं आणखीच अवघड जातं. मात्र, आता ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रशासनाने मोठी घोषणा केली आहे.

मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा डबा असणार आहे. याबाबतची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. लोकलमध्ये असणारा मालडबा हा ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. यासाठी मालडब्यातील आसने वाढवण्यात येणार आहेत.

जनहित याचिका

के. पी. नायर या व्यक्तीने बॉम्बे हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केली होती. ६६ वर्षे वय असणारे नायर हे दररोज वांद्रे ते चर्चगेट प्रवास करतात. यावेळी लोकल ट्रेनमध्ये त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे त्यांनी हायकोर्टात धाव घेत मदत मागितली होती.

मुंबईतील लोकलमधून दररोज सुमारे ५० हजार ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. पीक अवर्समध्ये जिथे तरुणांनाच लोकलमध्ये चढणं अशक्य होतं, तिथे ज्येष्ठांसाठी तर ही परीक्षाच असते. त्यात सेकंड क्लास डब्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ १४ जागा आरक्षित असतात. गर्दीमध्ये त्यादेखील ज्येष्ठांना मिळत नाहीत. याठिकाणी बसण्याची विनंती केल्यास कित्येक लोक दुर्लक्ष करतात, असं नायर यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं.

या याचिकेवर मध्य रेल्वेने हायकोर्टात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. यामध्ये त्यांनी आपल्या योजनेची माहिती दिली. मध्य रेल्वेने केलेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलं, की माल डब्यामध्ये ९० टक्के सामान्य प्रवासी असतात. त्यामुळे मालडब्यातील आसन क्षमता वाढवून तो ज्येष्ठांसाठी राखीव करण्यात येणार आहे.

यानंतर आता १२ डब्यांच्या लोकलमध्ये चार फर्स्ट क्लास डबे, तीन महिला डबे, दिव्यांगांसाठी दोन डबे, ज्येष्ठांसाठी एक (माल डबा) आणि उर्वरीत डबे सामान्य प्रवाशांसाठी असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

Late Sleeping Side Effects : रात्री १२ नंतर झोपत असाल तर सावध व्हा, वेळीच सवय बदला नाहीतर महागात पडेल!

Fact Check : वायनाड रोड शो मधील राहुल गांधींच्या T-Shirt वरील "I love Nafrat ki Dukan" स्लोगन खोटा, जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागील सत्य

Latest Maharashtra News Updates : उबाठा उमेदवार भाजप कार्यालयात

SCROLL FOR NEXT