mumbai loksabha  sakal
मुंबई

Mumbai Loksabha: मुंबईची लढत का आहे इतकी इंटरेस्टिंग? वाचा संपूर्ण आकडेवारी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई

२०१९ मधील एकूण उमेदवार - ११६

२०२४ मधील एकूण उमेदवार - १०६

----

कोणत्या पक्षाचे किती उमेदवार :

लोकसभा २०१९ -

काँग्रेस - तीन

भाजप - तीन

शिवसेना - तीन

राष्ट्रवादी - तीन

अपक्ष उमेदवारांची संख्या : १०४

---

लोकसभा २०२४ -

काँग्रेस - दोन

भाजप - तीन

शिवसेना (ठाकरे गट ) - चार

शिवसेना (शिंदे गट)- तीन

अपक्ष उमेदवारांची संख्या : ९२

------

मतदारसंघनिहाय झालेल्या प्रचारसभा : संख्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी : १ रोड शो

एकनाथ शिंदे : ३

उद्धव ठाकरे : १

देवेंद्र फडणवीस : १

राज ठाकरे : १

अमित शहा : १

शरद पवार : २

-----

महामुंबईतील उमेदवार

मुंबई

एकूण उमेदवार : १०६

महिला : १५

कोट्यधीश :

फौजदारी गुन्हे असलेले : (गंभीर गुन्हे असलेले उमेदवार)

पदवीधर : २७

----

पक्षनिहाय फौजदारी गुन्हे असलेले उमेदवार -

भाजप - ०

शिवसेना शिंदे गट - १

काँग्रेस - १

शिवसेना ठाकरे गट - १

इतर- ३२

पक्षनिहाय कोट्यधीश उमेदवार -

भाजप -३

शिवसेना शिंदे गट - ३

काँग्रेस - २

शिवसेना ठाकरे गट - ४

-----

२०१९ मधील विविध पक्षांचे बलाबल

दक्षिण मुंबई - शिवसेना (उठाबा)

दक्षिण मध्य मुंबई - शिवसेना

उत्तर मुंबई - (भाजप)

उत्तर मध्य मुंबई - (भाजप)

उत्तर पूर्व मुंबई -(भाजप)

उत्तर पश्चिम मुंबई -(शिवसेना)

-----

लक्षवेधी लढती

मतदारनिहाय ५० शब्दांत ग्राऊंड रिपोर्ट उद्या १२ वाजेपर्यंत पाठवावा

दक्षिण मुंबई - विनोद राऊत

दक्षिण मध्य मुंबई - मिलिंद तांबे

उत्तर मुंबई - संजीवकुमार भागवत

उत्तर मध्य मुंबई - बापू सुळे

उत्तर पूर्व मुंबई - विष्णू सोनवणे

उत्तर पश्चिम मुंबई - कृष्ण जोशी

----

प्रचारादरम्यान प्रमुख नेत्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे (पाइंटर स्वरूपात)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (५० शब्द)

एकनाथ शिंदे (५० शब्द)

उद्धव ठाकरे (५० शब्द)

देवेंद्र फडणवीस (५० शब्द)

राज ठाकरे (५० शब्द)

अमित शहा (५० शब्द)

---

मुंबईतील प्रचारात राष्‍ट्रीय स्तरावरील सहभागी झालेल्या नेत्यांची नावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, अरविंद केजरीवाल,

------

हॅट्‌ट्रिकच्या उंबरठ्यावर असलेले उमेदवार

राहुल शेवाळे, अरविंद सावंत

-----

उमेदवारांची शैक्षणिक स्थिती

दहावी उत्तीर्ण : १३

बारावी उत्तीर्ण : १७

पदवी : २२

पदव्‍युत्तर पदवी : २५

डॉक्टरेट : ५

पदविका : २

------

मुंबईतील मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या

शहर - २४,९०,२३८

पुरुष - १३,४३,९६९

महिला - ११,४६,०४५

तृतीयपंथी- २२४

--

उपनगर - ७४,४८,३८३

पुरुष - ४०,०२,७४९

महिला - ३४,४४,८१९

तृतीयपंथी- ८१५

---

उमेदवारांचा वयोगट

२५ ते ३० : ५

३१ ते ४० : २०

४१ ते ५० : २४

५१ ते ६० : २५

६१ ते ७० : २२

७१ ते ८० : ८

८१ ते ९० : ०

-----

२०१९ मध्ये मिळालेली एकूण मते

भाजप : १७,०७,९४७

शिवसेना : १४,१६,९१३

काँग्रेस : १५,०२,४७७

राष्ट्रवादी : २,८८,८७०

----

सर्वात श्रीमंत उमेदवार (नाव, पक्ष, मतदारसंघ, संपत्तीचे मूल्य)

पियूष गोयल - ११० कोटी भाजप, मुंबई उत्तर

उज्ज्वल निकम - २७ कोटी भाजप, मुंबई उत्तर मध्य

अमोल कीर्तिकर - ९ कोटी शिवसेना, ठाकरे गट मुंबई उत्तर पश्चिम

----

सर्वात तरुण उमेदवार - सबिना खान (२७)

सर्वात ज्येष्ठ उमेदवार - डॉ. अरुण मुरूडकर (७७)

------------------------------

दक्षिण मुंबई

मराठी कौल आणि दलित, मुस्लिमांचा कल कुणाकडे?

दक्षिण मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे. ठाकरे गटाचे उमेदवार व विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यात मुख्य लढत आहे. जाधव या भायखळ्याच्या आमदार आहेत. भाजप, मनसेची साथ, मिलिंद देवरा यांच्या मेहनतीवर यामिनी जाधव यांची भिस्त आहे; तर दुसरीकडे दांडगा जनसंपर्क, खासदार म्हणून केलेली विकासकामे, शिवसेनेतील फुटीमुळे ठाकरेंना मिळणारी सहानुभूती, दलित, मुस्लिम समाजाची साथ ही अरविंद सावंत यांची जमेची बाब आहे; पण मराठी मतदारांचा कौल आणि दलित, मुस्लिम समाजाचा कल यावर विजयाची सर्व गणिते अवलंबून आहेत.

दक्षिण मध्य मुंबई

धारावीची साथ कुणाला?

मातोश्रीच्या दोन आजी-माजी निष्ठावंतात या मतदारसंघात थेट लढत आहे. शिंदे गटाकडून राहुल शेवाळे; तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई मैदानात आहे. राहुल शेवाळे यांची स्वतःची यंत्रणा आहे. भाजप, मनसेला सोबतीला घेत मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. अनिल देसाई पहिल्यांदा लोकसभा लढवत असले, तरी निष्ठावंत शिवसैनिक शेवाळे यांची हॅट्रिक रोखण्यासाठी मजबुतीने मैदानात उतरले आहेत. काँग्रेस सोबत असल्यामुळे धारावीतील शेवाळे यांची लिड तोडण्याचा प्रयत्न देसाई यांचा आहे. त्यामुळे उद्धव, आदित्य ठाकरेंनी स्वतः लक्ष घातले आहे.

उत्तर पश्चिम मुंबई

सहानुभूतीच्या लाटेवर नौका पार होणार का?

या मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर अशी लढत आहे. निवडणुकांच्या तोंडावर वायकर यांनी मातोश्रीची साथ सोडली. मात्र, तपास यंत्रणेच्या त्रासामुळे पक्ष सोडल्याची कबुली वायकर यांनी दिली. त्यानंतर मतदारसंघातील वातावरण फिरले आहे. सेनेत पडलेली फाटाफूट, कीर्तिकरांच्या मागे लागलेल्या ईडीच्या ससेमिऱ्यामुळे सहानुभूती मिळताना दिसत आहे. शिवसैनिक झाडून त्यांच्या प्रचारात उतरला आहे. वायकरही ताकदीने मैदानात उतरले आहेत.

उत्तर मुंबई

गोयल यांचे मताधिक्य कितीने घटणार?

परंपरागत भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघातून भाजपने केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना निवडणूक मैदानात उतरवले. या मतदारसंघात गुजराती, हिंदी भाषकांची मते निर्णायक आहेत. ती परंपरागत मते मोदींना मिळतात. पियूष गोयल यांच्यासाठी सुरुवातीपासून भाजपची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. काँग्रेसने भूषण पाटील यांना शेवटच्या टप्प्यात उमेदवारी दिली. ते नवखे असले, तरी पक्षसंघटनेत मुरलेले आहेत. शिवसेना सोबतीला असल्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी असे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न पाटील यांचा आहे. गोयल यांचे मताधिक्य कितीने कमी करू शकतील, हा कळीचा मुद्दा आहे.

उत्तर मध्य मुंबई

दलित, मुस्लिम मतदाराचा कौल कुणाला?

या मतदारसंघात भाजपचे उज्ज्वल निकम विरुध्द काँग्रेसच्या वर्षा गायकवाड अशी लढत रंगली आहे. या मतदारसंघात दलित, मुस्लिम मते निर्णायक आहेत. हिंदी भाषक मतदार महत्त्वाचे आहेत. वर्षा गायकवाड या काँग्रेसचा दलित चेहरा आहेत. यासोबत शिवसेनेची सोबत असल्यामुळे प्रचारही आक्रमक सुरू आहे. दुसरीकडे बाहेरचा उमेदवार असा शिक्का पुसून काढण्याचे मोठे आव्हान उज्ज्वल निकम यांच्यापुढे आहे. त्यांच्यासाठी आशीष शेलार यांच्यासह भाजप संघटना मैदानात उतरली आहे. गुजराती, राजस्थानी, व्यापारी वर्गावर भाजपची भिस्त आहे. शेवटच्या टप्प्यात कसाब, हिंदू-मुस्लिम असे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होण्याची चिन्हे आहेत.

ईशान्य मुंबई

भाजपचा बालेकिल्ला भेदणार का?

मुंबईतील याच मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत सुरू आहे. भाजपचे मिहीर कोटेचा यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. या मतदारसंघातील गुजराती भाषक कायम भाजपच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र आहे. मराठी मतदारांना एकवटण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे. गुजराती-मराठी वाद या ठिकाणी रंगला होता. दोन्ही उमेदवारांनी आक्रमक प्रचार केला. हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेण्यात शिवसेना यशस्वी ठरणार का, हा चर्चेचा विषय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT