malaria sakal media
मुंबई

पावसाळी आजारांमध्ये मलेरियाचा उद्रेक ! जून महिन्यात ३५७ रुग्ण

पावसाळी आजारात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत (Mumbai) सध्या मलेरियाचा (malaria infection) प्रादुर्भाव वाढला असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या (BMC health department) आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जून महिन्यात 357 मलेरिया रूग्ण (malaria patients) आढळले होते. तर, जुलै अखेरच्या आठवड्यात मलेरियाचे 557 रूग्ण नोंद झाल्याने चिंता वाढली आहे. एकूण रुग्णांमध्ये 57 टक्के वाढ झाली असून इतर पावसाळी आजारांत (monsoon diseases) 20 ते 30 टक्के वाढ झाल्याचे समोर येत आहे. (Mumbai-malaria infection-BMC health department-malaria patients-monsoon diseases-nss91)

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात मलेरियाचे 557,  गॅस्ट्रोचे 294 रूग्ण, 37 लेप्टो, 28 डेंग्यू, 34 काविळ आणि 21 एच1 एन1 चे रूग्ण आढळले आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, कोरोना महामारी संसर्ग सुरु झाल्यापासून मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना अधिक सजगतेने सुरु केल्या आहेत. शिवाय साथरोग बाबत जागरूकता मोठ्या प्रमाणात निर्माण करणे सुरु आहे.

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, प्रत्येक वॉर्डात संसर्ग आणि साथरोग बाबत माहिती आणि जागरूकता  वाढवली आहे. तसेच साथरोगाचे रोजचे सर्वेक्षण, निदान आणि उपचारांवर भर देण्यात आली आहे. आजाराच्या उपाय योजनांच्या अंमलबजावणीवर देखील भर देण्यात आले आहे. शिवाय, प्रत्येक रुग्णालये आणि दवाखान्यांना रक्त तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड बाबत हाय रिस्क रुग्णांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पॉझिटीव्ह रुग्णांवर प्राधान्याने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डेंग्यूचे रुग्ण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आणखी वाढतील त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे.

पावसाळी आजारांची आकडेवारी :

 आजार        31 जुलै        जून

मलेरिया       557         357

लेप्टो             37           357

डेंग्यू               28             12

गॅस्ट्रो             294         180

एच१एन१       21            6

6 महिन्यांची आकडेवारी

मलेरिया - 2318

लेप्टो - 96

डेंग्यू - 77

गॅस्ट्रो - 1572

एच1एन1 - 28

लक्षणांना गांभिर्याने घेण्याची गरज

कोहिनूर रूग्णालयातील सिनियर फिजिशियन डॉ. शरत कोलके यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, लेप्टो आणि काविळ आजारांचा धोका अधिक असतो. कोविड-19 काळात मुंबईत या संसर्गजन्य आजारांचा प्रसार होत आहे. मलेरिया, डेंग्यूसारख्या कीटकजन्य आजारांना दूर ठेवण्यासाठी घराजवळील परिसर स्वच्छ ठेवा. घराबाहेर पावसाचे पाणी साचू देऊ नका. यामुळे लेप्टोचा धोका वाढू शकतो. घरांवरील छपरांवर, टॅंकमध्ये, ड्रम, टायर्स, कुंड्यामध्ये अशा संभाव्य डास उत्पत्ती स्थानं तपासून ती नष्ट करा.  डास चावण्यापासून वाचवण्यासाठी संपूर्ण अंग झाकले जाईल, असे कपडे घाला किंवा डास प्रतिबंधात्मक जाळीचा वापर करा. याशिवाय ताप, डोकेदुखी, डोळे लाल होणे, अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास स्वत:हून उपचार न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळीच उपचार न झाल्यास जीवाला धोका संभवू शकतो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT