Mumbai Murder Case esakal
मुंबई

Mumbai Murder : अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून गर्लफ्रेंडच्या नवऱ्याची केली हत्या, पोत्यात भरून..

सुरेशकुमारचे दिनेशच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते

सकाळ डिजिटल टीम

अंधेरी : अनैतिक संबंधांतून दिनेश पोसाराम प्रजापती (Dinesh Prajapati) या ३८ वर्षांच्या व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह घोडबंदर येथील जंगलात पुरून हत्येचा पुरावा नष्ट करणाऱ्‍या सुरेशकुमार मांगीलाल कुमावत या आरोपीस समतानगर पोलिसांनी (Samatanagar Police) अटक केली.

सुरेशकुमारचे दिनेशच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. या प्रेमसंबंधाला दिनेशकडून विरोध असल्याने सुरेशकुमारने त्याची हत्या करून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलिस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

दिनेश प्रजापती हा कांदिवलीतील समतानगर परिसरात राहत होता. २ जूनला तो घरातून निघून गेला आणि परत आला नव्हता. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याची मिसिंग तक्रार समतानगर पोलिसांत केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दिनेशचा शोध सुरू केला होता.

एक तरुण बाईकवरून गोणीतून काहीतरी घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. त्यामुळे या तरुणाचा शोध घेताना पोलिसांनी सुरेशकुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच दिनेशची हत्या केल्याची कबुली दिली. दिनेशच्या पत्नीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती मिळताच दिनेशने त्यास विरोध केला होता.

त्याचाच जाब विचारण्यासाठी दिनेश हा सुरेशकुमारच्या घरी आला होता. या वेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात त्याने दिनेशची हातोड्याने डोक्यात प्रहार करून हत्या केली. हत्येनंतर त्याने त्याचा मृतदेह एका गोणीत भरून घोडबंदर येथील जंगलात पुरून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. घटनास्थळाहून पोलिसांनी दिनेशचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT