मुंबई : 'लग्न करून पाच दिवस बायको असल्याचं नाटक करण्याचा प्रस्ताव मान्य करणं एका २१ वर्षीय तरुणीला चांगलच महागात पडलं आहे. तसेच हे लग्नाचं नाटक नसून आपलं खरच लग्न झालं याची कल्पनाही तरुणीला नव्हती. मात्र आपली फसवणूक झाल्याचं कळताच, तरुणीने पोलिसांत धाव घेतली.
टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारणाऱ्या तरुणीला पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात मध्य प्रदेशातील एका व्यक्तीच्या पत्नीची भूमिका करण्याचा प्रस्ताव तिची मैत्रीन आयेशा हिच्या पतीकडून देण्यात आला होता. तिने तो मान्यही केला.
ठरल्याप्रमाणे 21 मार्च रोजी तरुणी करणसोबत मध्य प्रदेशातील मंदसौर गावातील बसस्थानकावर पोहोचली असता करणने तिची ओळख त्याच्या ओळखीच्या मुकेशशी करून दिली. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुकेशने करणशी गुपचूप चर्चा केली. त्यानंतर तरुणीला सांगितलं की, तिला त्याच्या कुटुंबासमोर त्याच्या पत्नीची भूमिका करावी लागेल.
स्क्रिप्टनुसार, महिला आणि मुकेश यांनी एका मंदिरात लग्न केले. लग्नाला मुकेशचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर ती मुकेशच्या घरी गेली आणि तिने गृहिणीची भूमिका साकारली. पाच दिवस झाल्यानंतर सहाव्या दिवशी तिने मुकेशला सांगितले की, आता लग्नाचं नाटक थांबवावे लागले. तेव्हा मुकेशने तिला जाण्यास नकार दिला. त्याने नकार देताच, ती आश्चर्यचकित झाली. मुकेशने तिला सांगतिलं की, आपलं खरं लग्न झालं. तसेच यासाठी आपण करणला पैसे दिले. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.
दरम्यान आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्याने महिलेने मुंबईतील एका मित्राला फोन करून धारावी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. धारावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय खंडाळगावकर यांनी सांगितले की, मध्य प्रदेशात पोहोचताच करण आणि मुकेश पळून गेले. पोलिसांनी तिला मुंबईत आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे का, अशी विचारणा केली, मात्र तिने नकार दिला. पोलीस आता करण आणि आयेशाचा शोध घेत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.