Water-Supply 
मुंबई

मुंबईकरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल महत्त्वाची बातमी

सध्या विविध तलावांमध्ये असलेल्या पाणीसाठ्यानुसार पालिकेने व्यक्त केला अंदाज

समीर सुर्वे

मुंबई: शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये 4 लाख 50 हजार 928 दशलक्ष लिटर पाणी साठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने 40 हजार दशलक्ष लिटर पाणी कमी आहे. मात्र, उपलब्ध पाणीसाठा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरणार आहे. त्याचबरोबर मान्सून लवकर सुरु असल्याने यंदा पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता कमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 13 एप्रिलपर्यंत 4 लाख 91 हजार 756 दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. तर, यंदा 4 लाख 50 हजार 928 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 40 हजार म्हणजे जवळ जवळ दहा दिवसांची पाणीसाठा कमी आहे. पण, उपलब्ध पाणीसाठा ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सावधान! मुंबई लोकलमध्ये बनावट ओळखपत्र घेऊन चुकूनही जाऊ नका अन्यथा...

केंद्रीय वेधशाळेने यंदा मान्सून लवकर दाखल होऊन सरासरी पेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पाणी कपात करण्याची गरज भासण्याची शक्यता कमी असल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. सध्या अप्पर वैतरणामध्ये 75 हजार 726, मोडकसागरंमध्ये 44 हजार 653, तानसामध्ये 31 हजार 627, मध्य वैतरणामध्ये 43 हजार 228, भातसामध्ये 2 लाख 37 हजार 551, विहारमध्ये 14 हजार 257 आणि तुलसीमध्ये 3 हजार 841 दशलक्ष लिटर पाणीसाठी सध्या शिल्लक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT