मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी अमृता फडणवीस यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे घटस्फोटचं प्रमाण वाढत आहे, अस वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले आहे. यावर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांचा तर्क हस्यास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली. अमृता फडणवीस दरवेळी ऐकावं ते नवलं असंच काहीसे बोलत असतात. आता तर त्यांनी जावाई शोध लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर हसावं की रडावं असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. (Mumbai Mayor Kishori Pednekar Reaction On Amruta Fadnavis Controversial Statement On Mumbai Traffic And divorce)
किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. सामान्य स्त्रीमधील एक वेगळ दर्शन अनुभवायला मिळालं. त्यांनी आज पुन्हा मोठा जावाई शोध लावला. मुंबईतील 100 टक्के रस्ते हे गुळगुळीत आहेत असा दावा आम्ही कधीच केला नाही. पण ज्या ठिकाणी समस्या आहेत त्या ठिकाणी कामे करत आहोत आणि करत राहू. 105 जे घरी बसले आहेत त्यांच्या घरातील सामान्य स्त्रीला होणारा त्रास वेगळाच आहे, अशा शब्दांत किशोरी पेडणेकरांनी अमृता फडणवीस यांच्यासह भाजपवर टीका केली आहे. मुंबईकर त्यांच्या या करमणुकीच्या कार्यक्रमाला कंटाळला आहे, असेही त्या म्हणाल्या.
राजकारण आणि समाजकारणात असल्यामुळे आम्ही ही अधिक वेळ जनतेत घालवतो. आम्हालाही कुटुंबियांना अधिक वेळ देता येत नाही, असा दाखला देत अमृता फडवीस यांचा तर्क अजब असल्याचा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला.
ABP माझा या मराठी वृत्तवाहिनवर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्या पुढे म्हणाल्या की, आतापर्यंत त्यांनी (अमृता फडणवीस) यांनी भयानक विधाने केली आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे जवळपास 3 टक्के घटस्फोट होतात हे त्यांचे वक्तव्य सर्वात भयानक आहे. महाआघाडी सरकारवर बोलण्यापेक्षा केंद्राशी चर्चा करुन महाराष्ट्र आणि मुंबईला चांगले काही तरी आणूनं द्या असा टोला त्यांनी भाजपच्या नेत्यांनाही लगावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.