मुंबई

Mumbai Metro: थंडा थंडा, कुल कुल प्रवासाने मुंबईकर भारावले, सुखकर प्रवासाची प्रवाशांना अनुभूती

Latest Mumbai news: त्यामुळे बीकेसी, सांताक्रूझ, विमानतळ, मरोळ, अंधेरी एमआयडीसीतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Mumbai metro update : आरेपासून बीकेसीपर्यंतच्या बहुप्रतिक्षित मेट्रो-३ चा पहिला टप्पा कार्यान्वित झाला आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास बीकेसीहुन आरेकडे मार्गस्थ झालेल्या पहिल्या मेट्रोतून कोंडीमुक्त तसेच हॉर्नच्या गोंगाटविरहीत सुखकर प्रवासाची अनुभूती प्रवाशांना झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शनिवारी बीकेसी ते आरे पर्यंतच्या १२ किलोमीटर मार्गाचे भूमिगत मेट्रोचे लोकार्पण झाले. मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडने आजपासून ही सेवा प्रवाशांसाठी सुरू केली. सकाळी अकराच्या सुमारास बीकेसीहुन आरेसाठी आणि आरेहुन बीकेसीसाठी पहिली गाडी सुटली. सकाळपासूनच पहिल्या भूमिगत मेट्रोने प्रवास करण्यासाठी अनेकजण स्थानकात आले होते. काहींनी कुटुंबासह मेट्रो प्रवासाचा आनंद लुटला. दरम्यान, साडेसहा मिनिटाला एक याप्रमाणे दररोज ९६ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. तर मंगळवारपासून सकाळी साडेसहा वाजता पहिली मेट्रो धावणार आहे. त्यामुळे बीकेसी, सांताक्रूझ, विमानतळ, मरोळ, अंधेरी एमआयडीसीतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

--------

पहिल्याच दिवशी ८,५३२ जणांचा प्रवास

मेट्रो-३ मार्गावर सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून प्रवासी वाहतूक सुरू झाली. त्यानुसार पहिल्या दिवशी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल १५,७१३ जणांनी मेट्रोने प्रवास केला. दरम्यान, पहिलाच दिवस असल्याने फलाटावरील काचेच्या दरवाजाच्या थोडे पुढे जाऊन मेट्रो गाडीचा दरवाजा येत असल्याने प्रवाशांची काहीशी गैरसोय झाल्याचे दिसून आले.

मुंबईकरांकडून तोंडभरून कौतुक

मेट्रो स्थानकात संबंधित स्थानकाची प्रतिकृती एमएमआरसीएलने ठेवली आहेत. त्यामुळे नेमके स्थानक कसे आहे, याचा अंदाज प्रवाशांना बांधता येत आहे. त्याचबरोबर काम सुरू असतानाची ठिकठिकाणी लावलेली छायाचित्रेही प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत. चकाचक ट्रेन, भूमिगत स्थानक, बंदिस्त प्लॅटफॉर्म आणि संपूर्ण स्वयंचलित यंत्रणेबाबत मुंबईकरांच्या तोंडून कौतुकाचे शब्द बाहेर पडत होते.

मोबाईल नेटवर्कचा प्रश्न

मेट्रोच्या सर्व स्थानकात प्रवाशांना मोबाईल नेटवर्क मिळेल, असे एमएमआरसीएलने स्पष्ट केले आहे. मात्र, पहिल्याच दिवशी स्थानकात आणि प्रवासा दरम्यान अनेकांच्या मोबाईलला नेटवर्क नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात होत्या.

--------

मुंबईतील पहिली मेट्रो सेवेत आल्याने आता वाहतूक कोंडीशिवाय प्रवास करता येणार आहे. तसेच रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मनमानीला चाप लागणार आहे. पहिल्याच दिवशी मेट्रो प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी आलो आहे.

-अपर्णा शिंदे, प्रवासी

----------

वाहतूक कोंडीमुळे मुंबईतील प्रवास नकोसा झाला आहे. मात्र, मेट्रोमुळे प्रवास वेगवान होणार आहे. बीकेसी ते आरे हा प्रवास अवघ्या २५ मिनिटात केला . एरवी या प्रवासाला एक-दीड तास लागतो.

-अनिल शेनोय, प्रवासी

----

बीकेसीपासून विमानतळापर्यंत जाण्यासाठी रिक्षाला अर्धा तास लागतो. मात्र, मेट्रोमुळे अवघ्या १० मिनिटांत विमानतळावर पोहोचलो. या वेगवान प्रवासामुळे मुंबईकरांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे.

-श्रीमंतिनी पाटील, प्रवासी

-----

मरोळ ते बीकेसी असा दररोज प्रवास करतो. वाहतूक कोंडीमुळे मरोळहुन मेट्रोने घाटकोपरला जातो. तेथून लोकलने कुर्ला आणि पुढे रिक्षाने बीकेसीला येतो. त्यासाठी जवळपास एक तास लागतो. मात, आज अवघ्या पंधरा मिनिटात मरोळहुन थेट बीकेसीला मेट्रोने पोहोचलो.

-किसन कासारे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT