Aarey Protest Sakal
मुंबई

"प्रत्येक रविवारी आरे कारशेडविरोधात आवाज उठवणार"; आंदोलकांकडून पुन्हा आंदोलन

जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाहीत आणि कारशेडचे काम थांबणार नाही तोपर्यंत प्रत्येक रविवारी आंदोलन करणार असल्याचा पवित्रा पर्यावरणवाद्यांनी घेतला.

दत्ता लवांडे

मुंबई : मुंबईतील आरे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून पुन्हा आरे कारशेड विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. आम्ही प्रत्येक रविवारी आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारने कारशेडला स्थगिती दिली होती पण भाजप सत्तेत आल्यावर त्यांच्याकडून स्थगिती उठवण्यात आल्यामुळे आंदोलन करण्यात येत आहे.

(Mumbai Aarey Forest Protest Updates)

दरम्यान, शिंदे फडणवीस सरकार विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. सरकारच्या दडपशाहीविरोधात हे आंदोलन आहे. कोणत्याही परिस्थितीत आरे जंगल वाचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं आंदोलकांकडून सांगण्यात आलं आहे.

"आरे जंगल वाचलं पाहिजे, आरेला जंगल घोषित करा. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाहीत आणि कारशेडचे काम थांबणार नाही तोपर्यंत प्रत्येक रविवारी आंदोलन करणार असल्याचा पवित्रा पर्यावरणवाद्यांनी घेतला आहे. दरम्यान मागच्या वेळी शिवसेनेचे आदित्य ठाकरे आरे वाचवा या मोहिमेमध्ये सामील झाले होते. त्यांच्यासोबत अनेक लहान मुलेही मोहिमेत सहभागी झाले होते.

आंदोलनात लहान मुले असल्यामुळे एका संस्थेने राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर आयोगाने मुंबईच्या पोलिसांना नोटीस देत याप्रकरणी तीन दिवसांत तपास करून अहवाल देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे आदित्य ठाकरे अडचणीत येणार का अशा चर्चा झाल्या होत्या.

आरे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरण वाद्यांकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. आरे वाचवण्याची लोकलमध्येही काही लोकांकडून जनजागृती करण्यात येत आहे. पण महाविकास आघाडीने या प्रकल्पाला स्थगिती दिल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारे पुन्हा आरे कारशेडचे काम चालू केले आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून आंदोलन करण्यात येत आहे.

त्याचबरोबर मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरूनआश्विनी भिडे यांची आघाडी सरकारने बदली केली होती पण आता पुन्हा भाजप सत्तेत आल्यावर भिडे यांच्याकडे मेट्रो प्रकल्पाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे कारशेड प्रकल्पाला गती येणार असल्याच्याही चर्चा होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात; कोणाला कोठून संधी?

Ramesh Wanjale: मनसेनं ठेवली आठवण! रमेश वांजळेंचे पुत्र मयुरेश वांजळेंना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर

Pune Crime : मालकाने पाळीव कुत्र्याला लटकावले फासावर; पर्वतीमध्येही श्वानावर गोळी झाडल्याचा प्रकार उघडकीस

MNS Vidhan Sabha Candidate List: दुसरे ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात! मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीतून संदीप देशपांडे

महिला आयोगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द; ऐन दिवाळीत क्रूर निर्णय घेतल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT