Mumbai Metro Sakal
मुंबई

Mumbai Metro: जिवाची मुंबई करायला मेट्रोची साथ, मुसळधार पावसात प्रवाशांमध्ये झपाट्याने वाढ

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Metro: मागील काही दिवसांपासून मुंबई शहरात आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण आला आहे. संततधार पावसात सुरक्षित आणि आरामदायक वाहतूक व्यवस्था म्हणून मुंबईकरांनी मुंबई मेट्रोला आपली पसंती दर्शविली आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून मुंबई मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

त्यानुसार २४ जुलै २०२३ रोजी, २ लाख १२ हजार ४९०, २५ जुलै २०२३ रोजी २ लाख १८ हजार ६३५, तर २६ जुलै २०२३ रोजी सर्वाधिक म्हणजे २ लाख २२ हजार २९० इतकी दैनंदिन प्रवसंख्या नोंदवली गेली आहे. प्रवासी संख्येत वाढ होणे हे प्रवाशांचे मेट्रो वर असलेल्या विश्वासार्हतेच आणि कार्यक्षमतेच उदाहरण आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर तसेच सर्वत्र पाणी साचले, ज्याचा परिणाम हा सार्वजनिक तसेच खाजगी वाहतुकीवर झाला, त्यासोबतच नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर झाला.(Latest Marathi News)

याशिवाय मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मात्र, विनाव्यत्यय सुरु असलेल्या मुंबई मेट्रो मुळे नागरिकांना बऱ्याच प्रमाणात दिलासा मिळाला.

मुसळधार पावसातही मुंबईकरांना अविरत सेवा पुरविणे हे स्थापित करण्यात आलेल्या मान्सून नियंत्रण कक्षाच्या उपाययोजनांमुळे शक्य झाले आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत असताना देखील मुंबई मेट्रोला विना व्यत्यय १००% सेवा सुरु ठेवण्यात यश आले असून, नेहमीप्रमाणे दररोज २५३ सेवा चालवल्या गेल्या.

“मुंबईकरांनी मुसळधार पावसात सोईस्कर आणि पर्यावरणपूरक अशा मुंबई मेट्रोचा पर्याय निवडला याचा आम्हाला आनंद आहे. लोकांसमोरील येणारी आव्हाने आम्ही समजून घेतो आणि त्यांना त्रासमुक्त सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही तत्पर आणि प्रयत्नशील आहोत. प्रवाशांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि अशा परिस्थितीत मुंबई मेट्रोची निवड केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो," असं महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT