Mumbai Metro will run till late night during Navratri festival anderi  sakal
मुंबई

Mumbai Metro: मुंबईकरांना दिलासा; नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत धावणार मेट्रो!

Andheri News: नवरात्रोत्सवानिमित्त वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी रात्री उशिरापर्यंत घराबाहेर पडणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Navaratra Utsav: महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमएमओसीएल) राज्य सरकारच्या निर्देशानुसार नवरात्रोत्सवादरम्यान अंधेरी-गुंदवली ही मेट्रो सेवा रात्री सव्वाबारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १२ अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवानिमित्त वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी रात्री उशिरापर्यंत घराबाहेर पडणाऱ्या

सुविधेसाठी ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अतिरिक्त मेट्रो सेवा पुरविण्यात येईल. या कालावधीत दररोज १२ अतिरिक्त मेट्रो सेवा चालविण्यात येतील आणि दोन मेट्रो सेवांमध्ये १५ मिनिटांचा वेळ असेल.

या उत्सवात सहभागी होऊन मध्यरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवासाचा लाभ घेता येईल, असे महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले.

वाढीव सेवांचे वेळापत्रक

वाढीव १२ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. अंधेरीहून सुटणारी मेट्रो गुंदवलीवरुन प्रवासी घेऊन पुन्हा अंधेरीला परतणार आहे.

अंधेरी (पश्चिम) - गुंदवली

रात्री. ११.१५

रात्री ११.३०

रात्री ११.४५

मध्यरात्री १२

मध्यरात्री १२.१५

मध्यरात्री १२.३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

SCROLL FOR NEXT