मुंबई

Mumbai Mhada Flats: म्हाडा गोरेगाव पत्राचाळीत उभारणार २५०० घरे

या भूखंडावरील ३०६ लॉटरीधारकांसाठीच्या इमारतीचे काम पूर्ण होत आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Mumbai news: गैरव्यवहारामुळे चर्चेत आलेल्या गोरेगाव पत्राचाळीच्या भूखंडावरील २,५०० घरांची म्हाडाकडून लॉटरीच्या माध्यमातून विक्री होणार आहे. पुढील तीन वर्षांत ही घरे तयार करण्यात येणार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

म्हाडाने गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्विकासासाठी खासगी विकसकाची नियुक्त केली होती; मात्र संबंधित विकसकाने गैरव्यवहार केल्याने म्हाडाने स्वतः मूळ रहिवाशांसाठी घरे उभारली आहेत. या भूखंडावरील ३०६ लॉटरीधारकांसाठीच्या इमारतीचे काम पूर्ण होत आले आहे.

त्यामुळे रिकाम्या जागेवर विक्रीसाठी घरे बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून २०२७ पर्यंत तयार घरांची लॉटरीच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे.

ओसी मिळताच घराचा ताबा

पत्राचाळीतील ३०६ घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने २०१६ मध्ये लॉटरी काढली होती; मात्र इमारतीचे काम अपूर्ण असल्याने आठ वर्षांच्या काळात संबंधित लॉटरी विजेत्यांना घरे मिळू शकलेली नाहीत. सध्या तीन विंगच्या फायर एनओसी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ओसी मिळताच लॉटरी विजेत्यांना घराचा ताबा दिला जाणार असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

आलिया कपडे बदलत असताना तो सतत तिच्यावर... इम्तियाज अली यांनी सांगितली ती घटना; म्हणाले- त्याला मी पाहिलं तेव्हा

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

Nashik Police : मतमोजणी केंद्राभोवती कडेकोट सुरक्षा तैनात; सशस्त्र आयटीबीपीची करडी नजर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

SCROLL FOR NEXT