mla raju patil sakal
मुंबई

Mumbai : जोड मजबूत...तोंड विरुद्ध दिशेला काय मजबुरी असेल...मनसेचे आ.राजू पाटील यांचे ट्विट काय सुचवते

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : जोड 'मजबूत' आहे आणि तोंड 'विरुद्ध' दिशेला. काय 'मजबूरी' असेल ? कधी कधी जाहिरातींचे अर्थ काही कळत नाही बुवा. असे ट्विट कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी केले आहे. राजकीय अर्थ काढू नये अशी टीप देखील त्यांनी त्या खाली दिली आहे. असे असले तरी भाजप शिंदे गटाच्या मजबूत जोड खरेच मजबूत आहे का ? असे आमदार पाटलांनी कोणाचं नाव न घेता सूचित केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि लोकसभा मतदार संघातील वर्चस्वामुळे भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली होती. मित्र पक्षात सारे काही आलबेल असल्याचे दाखविले जात होते मात्र स्थानिक पातळीवर तसे चित्र दिसत नव्हते. शहरांतील बॅनर बाजीतून भाजप शिंदे कार्यकर्त्यांमधील धुसफूस दिसून येत होती. वरिष्ठांच्या मनात देखील खदखद असल्याने कार्यकर्त्याना त्यांचं पाठबळ मिळत होते. अखेर बॅनर बाजी थांबवा असे आव्हान वरिष्ठांकडून

कार्यकर्त्यांना करण्यात आले.

भाजप आणि शिंदे गटातील वादावर पडदा पाडत दोन्ही नेत्यांनी एका मंचावर येत आमची मैत्री आधी पासून आहे. आमच्या युतीत एक वर्षांपूर्वी मिठाचा खडा पडला होता, तो आम्ही फेकून दिला. आमची दोस्ती आताची नाही तर आम्ही आमदार होतो तेव्हापासून आहे. हवं फेव्हीकॉलचा जोड आहे. कितीही ओर्यटन केले तरी दोस्ती तुटणार नाही अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर मध्ये सांगितले. त्यानंतर भाजप शिंदे गटातील वादावर पडदा पडल्याचे बोलले जात आहे. मात्र हा पडदा खर्च पडला का याविषयी अद्याप जोरदार चर्चा सुरू आहे.

त्यातच कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केलेले ट्विट काही सूचित करत आहे.

आमदारांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी फेव्हिकॉल ची जाहिरातीचा अर्थ कळत नाही असे म्हणत त्यांनी जाहिरात मध्ये दोन हत्ती असून त्यांची तोंड विरुद्ध दिशेला आहेत. यावरून त्यांनी भाजप शिंदे गटाला टोला हाणला आहे.

आमदार पाटील यांचे ट्विट

जोड 'मजबूत' आहे आणि तोंड 'विरुद्ध' दिशेला. काय

'मजबूरी' असेल ? कधी कधी जाहिरातींचे अर्थ काही कळत नाही बुवा.

(वि.सू.: कृपया ह्या शंकेचा राजकीय अर्थ काढण्याचा प्रयत्न करू नये.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satyapal Malik: "अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."; सत्यपाल मलिकांचा खळबळजनक खुलासा

Dharavi Mosque: धारावी मशीद प्रकरण; बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी समितीला 8 दिवसांची मुदत, अन्यथा...

Zero to hero! शुभमन गिलने भारी पराक्रम नोंदवला, आपला Rishabh Pant ही विक्रमाच्या बाबतीत मागे नाही राहिला

Mumbai University Senate Election : उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच होणार

Delhi CM Atishi: दिल्लीत आता आतिषी सरकार! मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी संपन्न; नव्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT