मुंबई : मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता घालवून महापालिकेवर भाजपचा झेंडा उभारण्यासाठी नव्या मोहिमा हाती घेण्यात येत असून, नव्या सरकारमधील मंत्र्यांना मुंबईकरांच्या दारात पाठवून आतापासूनच मते वळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून ‘धन्यवाद मोदीजी’ हा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. यानिमित्ताने मुंबईसह राज्यभर निवडणुकीचे वातावरण निर्माण होणार असल्याचे दिसत आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकेतील शिवसेनेच्या सवेला सुरुंग लावण्याची भाजपची रणनीती आहे. शिंदे गटासोबतच्या हातमिळवणीनंतर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना गळाला लावून, ताकद वाढविण्याच्या जोरदार हालचाली करण्यात येत आहेत. त्याकरिता दिल्लीतील पक्षाच्या बड्या नेत्यांना आणून महापालिकेत ‘शत प्रतिशत’ भाजपचा अजेंडा राबविण्यात येत आहेत.
हे सारे करताना कुठेच कमी राहू नये म्हणून सरकारमधील मंत्र्यांनाही मुंबईत दारोदारी फिरवले जाणार असून, त्यासाठी खास मंत्री आपल्या दारी ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यातून सरकारची कामे प्रत्येक मुंबईकरापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर लोकसभा निवडणुकीसाठी ‘मिशन २५’ चे लक्ष्य गाठण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून म्हणजे २ ऑक्टोबरपासून भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडून ‘धन्यवाद मोदी’ हा कार्यक्रम घेण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.