mumbai-municipal-corporation sakal
मुंबई

Mumbai : शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबला पालिकेची नोटीस

२४ तासांत कार्यवाही करण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवाजी पार्क येथील बंगाल क्लब प्रशासनाकडून खानपानासाठी व्यवस्था करताना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर पालिकेच्या जी/उत्तर विभागाकडून या क्लबला नोटीस बजावली आहे. २४ तासांत याबाबत कार्यवाही करा, अन्यथा पालिका कारवाई करेल अशी नोटीस जी/उत्तर विभागाचे वैद्यकीय अधिकारी विरेंद्र मोहिते यांनी क्लबला नोटीस बजावली आहे.

दादर पश्चिम वीर सावरकर रोड, शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबची २२ नोव्हेंबर रोजी पालिकेकडून पाहणी करण्यात आली. या पाहणीत उपहागृहात परवानगी न घेता सहा सिलिंडरचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. शिवाय पालिकेच्या आरोग्य विभागाची परवानगी न घेता खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचे निदर्शनास आले होते. हे धोकादायक असल्याने पालिकेकडून मुंबई महानगरपालिका अ‍ॅक्ट नुसार ३९४ (४) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT