mumbai municipal corporation sakal
मुंबई

Mumbai News : पालिकेच्या अर्थसंकल्पात संशोधन विकासाला मिळणार चालना

मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात यंदाच्या वर्षाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद असणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात यंदाच्या वर्षाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद असणार आहे.

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात यंदाच्या वर्षाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद असणार आहे. मुंबईकरांना महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या सेवांसाठी प्रोत्साहन देण्यासाठीची तरतूद अर्थसंकल्पात करणे अपेक्षित आहे. पालिकेच्या स्माईल काऊंसिलच्या माध्यमातून विविध संशोधन आणि विकास प्रकल्प राबवण्यात येतात. या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून स्टार्ट अप मॉडेलला चालना देण्यात येते.

मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून स्टार्ट अप मॉडेलमध्ये आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्र आणि घनकचरा व्यवस्थापन विभागासाठीचे मॉडेल राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत रोबोटिक हॅण्ड, जिनोम सिक्वेन्सिंग, डायबेटिक फूट यासारख्या स्टार्ट अप सोल्यूशनच्या माध्यमातून विविध उत्पादने देण्यात आली आहेत. येणाऱ्या काळात नागरिकांच्या सेवेबाबत आणखी सोल्यूशन देण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यामध्ये वेस्ट टू एनर्जी तसेच बायोगॅस यासारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून आणखी सेवा देण्याचा पालिकेचा मानस आहे.

पालिकेकडून तंत्रज्ञानावर आधारीत आणखी सेवा देण्यासाठीची तरतूद आगामी अर्थसंकल्पात होणे अपेक्षित आहे. त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण सोल्यूशन देण्याचा पालिकेचा मानस आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तसेच नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाचा समावेश आगामी प्रकल्पात असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashinath Date: पारनेरमध्ये लंकेंच्या गडाला सुरुंग लावणारे काशिनाथ दाते कोण? काय होती रणनीती?

Latest Marathi News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल

Weight Gain Problem : मुलांपासून प्रौढांमध्ये लठ्ठपणामुळे वाढती समस्या, आरोग्यावरील गंभीर परिणाम आणि उपाय...जाणून घ्या

Ahilyanagar Crime : पाळीव 'पोपट' मारला; तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तीन महिन्याच्या शिक्षेसह 500 रूपये दंड

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT