Water supply esakal
मुंबई

Water Isolation : मुंबईकरांना पाण्याचे आयसोलेशन पडणार पथ्थ्यावर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाद्वारे मोठे काम नुकतेच हाती घेणयात आले होते. पाणी पुरवठा विषयक सुधारणेसाठी तसेच परिरक्षणाची कामे यानिमित्ताने करण्यात आली.

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाद्वारे मोठे काम नुकतेच हाती घेणयात आले होते. पाणी पुरवठा विषयक सुधारणेसाठी तसेच परिरक्षणाची कामे यानिमित्ताने करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने गेल्या ४२ वर्षात पहिल्यांदाच संपुर्ण प्लांटचे ऑपरेशन २४ तासांसाठी बंद ठेवले. पण या काळात कामाच्या निमित्ताने अनेक आव्हानांवर मात करत पालिकेने मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत केला. दरम्यानच्या काळात विभागाने एकुण ३८ कामे संपूर्ण मुंबईत हाती घेत ही कामे विक्रमी वेळेतही पूर्ण केली.

भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रातील अतिरिक्त ४ हजार मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेकडून ३० जानेवारीला हाती घेण्यात आले होते. भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या जल वाहिन्यांवर २ ठिकाणी झडपा बसवणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे, २ ठिकाणी उद्भवलेली गळती दुरूस्त करणे अशी कामे या काळात पालिकेने हाती घेतली होती. त्यामुळे १४ विभागातील पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम झाला होता. मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे अतिशय विक्रमी वेळेत तसेच दिवसरात्र अन् युद्ध पातळीवर ही कामे पूर्ण करण्यात आली.

भांडूप ते बोरिवली या दरम्यान जवळपास १० किलोमीटर दुरून पाण्याच्या पाईपलाईनने भांडुप संकुलात पाणी येते. जल अभियंता विभागाकडून सकाळी १० वाजता या पाईपलाईनमधील पाणी काढण्याची सुरूवात झाली. पण पाण्याचा प्रेशर खूप असल्याने सायंकाळी ७ वाजेपर्यंत या पाईपलाईनमधून पाणीच संपत नव्हते. अखेरीस सात नंतर पाईपलाईनचे संपूर्ण पाणी रिकामे झाल्यानंतर याठिकाणी कामाला सुरूवात झाली. या मोठ्या कामासाठी पालिकेच्या ५०० कामगारांसह १०० अभियंत्यांची टीम कामाला लागली होती. या कामासाठी पालिकेने सेवानिवृत्त झालेल्या अनुभवी अशा अधिकारी वर्गालाही मदतीला बोलावले होते. ४२ वर्षांत पहिल्यांदाच आयसोलेशन घेऊन मुंबईचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता.

या संपूर्ण पाणी पुरवठा बंदच्या आयसोलेशनच्या कालावधीत पालिकेकडून एकुण ३८ कामे पूर्ण करण्यात आली. प्रत्येक मिनिटाच्या हिशोबाने ही कामे नियोजनबद्ध अशा पद्धतीने करण्यात आली. या कामांमध्ये ३ कामे ही जवळपास २०१२ पासून म्हणजे अकरा वर्षांपासून रखडली होती. या आयसोलेशनच्या कालावधीत बोरिवली, मालाड, वेरावले, वांद्रे याठिकाणी छोटी छोटी कामे पूर्ण केली. त्यामध्ये पाण्याची गळती रोखण्यासाठीचीही कामे करण्यात आली.

मुंबईतील नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा अतिशय सुरळीतपणे आणि चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी ही तांत्रिक कामे हाती घेण्यात आली होती. ही तांत्रिक आणि परिरक्षणाची कामे योग्य पद्धतीने झालेली असली तरीही जल अभियांत्रिकीद्वारे दृष्टीकोनाद्वारे येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील १२ विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेने केले आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व, एच पश्चिम तसेच पूर्व उपनगरातील एस, एन, एल या १२ विभागांचा पाणी पुरवठा बंद होता. तर जी उत्तर आणि जी दक्षिण विभागात काही परिसरात २५ टक्के पाणी कपात करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LIC Mutual Fund: एलआयसीची मोठी घोषणा; गुंतवणूकदारांसाठी आणणार 100 रुपयांची SIP, काय आहे प्लॅन?

IND vs BAN 1st Test : 'भाई, इधर एक फिल्डर आएगा...'; Rishabh Pant ने बांगलादेशची फिल्डिंग सेट केली Video Viral

Manoj Jarange Patil: मध्यरात्री जरांगे यांना ४ सलाईन, आंतरवाली सराटीत नक्की काय घडलं? या कारणामुळे झाला मराठा-ओबीसी वाद !

नियम पाळून, टॅक्स भरून त्यांना काय मिळतं तर... प्रियदर्शन जाधवने मांडली मुंबईकरांची दुखरी बाजू

Latest Marathi News Updates : स्थानिकांनी घातला धारावी पोलीस ठाण्याला घेराव

SCROLL FOR NEXT