mumbai municipal corporation sakal
मुंबई

Mumbai Municipal : ब्रिटीशकालीन दगडांचे जतन व पुनर्वापरासाठी पालिकेचा पुढाकार

ब्रिटीशकालीन दगडांचे जतन व पुनर्वापरासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. रे-रोडच्या ११२ वर्षे जुन्या रेल्वे पुलाचा पुनर्विकास पालिकेने सध्या हाती घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

ब्रिटीशकालीन दगडांचे जतन व पुनर्वापरासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. रे-रोडच्या ११२ वर्षे जुन्या रेल्वे पुलाचा पुनर्विकास पालिकेने सध्या हाती घेतला आहे.

मुंबई - ब्रिटीशकालीन दगडांचे जतन व पुनर्वापरासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. रे-रोडच्या ११२ वर्षे जुन्या रेल्वे पुलाचा पुनर्विकास पालिकेने सध्या हाती घेतला आहे. पुनर्विकासादरम्यान काढण्यात आलेले पुलाचे दगड हे टाकून देण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्थान असणा-या ऑगस्ट क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वारासाठी करण्यात आला आहे. यामुळे ऑगस्ट क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वाराला ऐतिहासिक रुपडे प्राप्त झाले आहे.

रे रोड पुलाच्या कामादरम्यान ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा नमुना असलेले सुंदर बांधकाम जेसीबीच्या एका फटकार्‍यात जमिनदोस्त होऊ शकले असते. परंतु, तेथील ऐतिहासिक आणि कलात्मक दगड जतन करण्याच्या उद्देशाने आणि पुरातन वास्तूजतन कक्षाने अत्यंत विचारपूर्वक व काळजीपूर्वक केलेल्या कार्यवाहीमुळे तेथील दगडी खांब जसेच्या तसे दुसरीकडे उभे उभे करण्यात आले आहेत. ऑगस्ट क्रांती मैदानासारख्या ऐतिहासिक संदर्भ असलेल्या जागेच्या ठिकाणी या शतकपूर्ती करणा-या ब्रिटीशकालीन दगडांचा पुनर्वापर करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात रे-रोड पुलाच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पास सुरूवात झाली. त्याचवेळेस ऑगस्ट क्रांती मैदानाच्या जिर्णोद्धार व संवर्धनाचे काम देखील सुरू होते. त्यामुळे रे-रोड पुलाच्या दगडी खांबांना पुन:र्स्थापित करण्याचा निर्धार पालिकेच्या पुरातन वास्तू जतन खात्याने केला. त्यानंतर नियोजनबद्धरित्या व शास्त्रोक्त पद्धतीने खांबांच्या दगडांना व्यवस्थित क्रमांक देऊन, एक-एक दगड काळजीपूर्वक सुटा करण्यात आला. हे सर्व दगड ऑगस्ट क्रांती मैदानाच्या कामाच्या ठिकाणी नेण्यात आले व पुन्हा एकदा हे खांब पूर्वी जसे होते, तसेच उभे करण्यात आले. या अतिशय नियोजनबद्ध आणि अचूक पद्धतीच्या कामामुळे ऑगस्ट क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वाराला एक ऐतिहासिक रुप प्राप्त झाले आहे.

या कामासाठी पुरातन वास्तू जतन सल्लागार व वास्तू रचनाकार (आर्किटेक्ट) पंकज जोशी यांनी सल्लागार म्हणून काम पाहिले. तर कंत्राटदार सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रा.लि. यांच्या कुशल कारागिरांनी सदर काम योग्यप्रकारे पार पाडले आहे. पुरातन वास्तू जतन कक्षामार्फत जिर्णोद्धार करण्यात आलेले ऑगस्ट क्रांती मैदानाचे हे प्रवेशद्वार म्हणजे इच्छाशक्तीच्या व कल्पकतेच्या जोरावर उत्तम काम करता येते, याचे जिवंत उदाहरण असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT