Vasai Murder Case Esakal
मुंबई

Vasai Murder Case: 'तेव्हा पोलिसांनी कारवाई केली असती तर...', बहिणीच्या निर्घृण हत्येनंतर सानिया यादव काय म्हणाली?

अंकिता खाणे (Ankita Khane)

वसई शहरात घडलेल्या आरती यादवच्या हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. आरतीची हत्या केलेला आरोपी रोहित यादवने आरतीची एवढ्या निर्घृण हत्या का केली?, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. वसई हत्याकांडाचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. या व्हिडिमध्ये दिसते, जेव्हा आरोपी रोहित आरतीवर हल्ला करतो तेव्हा आजुबाजूला असणारे लोक त्याला न थांबवता घटनेचा व्हिडिओ काढत होते. जर परिसरातील लोकांनी तिची मदत केली असती तर आज आरतीचा जीव वाचला असता. या घटनेनंतर आरतीची बहीण सानिया यादवने प्रतिक्रिया देताना पोलिसांनी रोहितवर कारवाई केली असती तर आज माझी बहिण जिवंत असती असं म्हटलं आहे.

आरती यादवची बहिण सानिया यादव म्हणाली, "आरोपी रोहित यादव आरतीला गेल्या तीन ते चार दिवसांपासून त्रास देत होता. गेल्या शनिवारीही त्याने माझ्या बहिणीला मारहाण केली होती. इतकंच नाही तर रोहितने तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला होता. यामध्ये आरतीचा मोबाईलही आरोपी रोहितने फोडला. आम्ही पोलिसांकडे तक्रार केली होती, पण पोलिसांनी त्याला (रोहित) बोलावले आणि काही वेळाने सोडून दिलं. पोलिसांनी रोहित यादववर कोणतीही कारवाई केली नाही. त्यावेळी पोलिसांनी सांगितले की, मोबाईल ठिक करण्यासाठी फारसा खर्च येणार नाही. माझ्या बहीणीला आरतीला न्याय मिळायला हवा."

मिळालेल्या माहितीनुसार, आरती यादव आणि रोहित यादव यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपी रोहित यादव याने वसईतील गावराईपाडा परिसरात आरतीला कामाला लावले होते. महिनाभरापूर्वी आरोपी रोहित यादवला आरती कुठे काम करते यावरून संशय आला. तिथल्या कुणाशी तरी तिचं अफेअर सुरू आहे, असं त्याला वाटतं होतं यावरून गेल्या महिनाभरापासून दोघांमध्ये वाद सुरू होता. यामुळे आरतीचे रोहित यादवसोबत ब्रेकअप झाले होते.

या घटनेमुळे आरोपी रोहित चांगलाच चिडला आणि त्याने आरती यादवला मारहाण केली त्यानंतर तिची हत्या केली. रोहित यादव हा हरियाणाचा आहे, तर आरती उत्तर प्रदेशची रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही आधी नालासोपारा पूर्वेकडील शिर्डीनगर भागात राहत होते, मात्र नंतर आरतीचे कुटुंब दुसरीकडे स्थलांतरित झाले, वसई पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.

नेमकं काय घडलं?

आरती मंगळवारी (18 जून) सकाळी कामासाठी घरून निघाली. त्यानंतर संतापलेल्या रोहितने गौरीपाड्यात तिच्याशी बोलून तिचे कोणासोबत संबंध आहेत, अशी विचारणा केली. ती चालत राहीली यावेळी रोहितने हातातील लोखंडी पाना तिच्या डोक्यात घातला. वारंवार वार केल्यामुळे आरती रक्ताच्या थारोळ्यात पडली. तो काही पावले पुढे गेला आणि मग तो जिवंत आहे की नाही हे पाहण्यासाठी परत आला. तिला जिवंत पाहून त्याने पूर्ण ताकदीने तिच्या मानेवर वार केले आणि आरतीचा मृत्यू होईपर्यंत वार करत राहिला.

यानंतर, तो आरतीच्या मृतदेहाशेजारी बसला आणि म्हणू लागला, "तू माझ्यासोबत असं का केलंस?" आरतीने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. एका व्यक्तीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, रोहितने त्याला ढकलून दिले. इतर लोकांनी आणखी थोडे प्रयत्न केले असते तर आरती आज वाचली असती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT