Vanatara  Esakal
मुंबई

Vantara Animal Rahab: रिलायन्सने सुरू केलं देशातील पहिले प्राणी बचाव पुनर्वसन केंद्र, अशी सुचली अनंत अंबानी यांना कल्पना ?

सकाळ डिजिटल टीम

Vantara Animal Rahab Jamnagar: मोठे प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी यांच्यासाठी देशातील पहिले बचाव, मदत आणि पुनर्वसन केंद्र रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्यातर्फे जामनगर येथे सुरू करण्यात आले आहे. जामनगर येथील रिलायन्सच्या रिफायनरी संकुलातील तीन हजार एकर जागेत हे केंद्र सुरू झाले आहे. विशेष म्हणजे देशातील तसेच आंतरराष्ट्रीय नियम पाळून परदेशातील अडचणीत सापडलेले मोठे प्राणी देखील येथे आणण्यात आले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम वनतारा सुरू करण्यात आला आहे. वनतज्ज्ञ आणि प्राणीतज्ज्ञ यांच्या सहकार्याने हा तीन हजार एकरांचा परिसर जंगलासारख्या वातावरणात परिवर्तित केला असून त्यामुळे प्राण्यांना नैसर्गिक अधिवास असल्याचा भास होईल.

या प्राण्यांच्या बचावासाठी आणि पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या जागतिक प्रयत्नांना साथ देण्यासाठी उपक्रम होत आहे. प्राण्यांसाठी आरोग्य केंद्र, रुग्णालय तसेच संशोधन आणि प्राण्यांविषयी माहिती प्रशिक्षण देणारे केंद्र देखील येथे आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या मदतीने येथे आधुनिक संशोधन देण्याचाही प्रयत्न होईल. (Latest Marathi news)

गेली अनेक वर्षे येथे २०० हत्ती तसेच हजारो इतर प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. गेंडा, मगर, बिबट्या यांच्या पुनर्वसनासाठीही येथे प्रयत्न सुरू आहेत. मेक्सिको, व्हेनेझुएला येथूनही मोठे प्राणी येथे आणले आहे. झू ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या मदतीने भारतातील दीडशे प्राणी संग्रहालयाची परिस्थिती सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे अनंत अंबानी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'त्यांची नियत नीट नव्हती, म्हणून त्यांच्या हातून अनावरण झालेला पुतळा कोसळला'; राहुल गांधींचा भाजपला सणसणीत टोला

कमला हॅरिस, तुलसी गॅबार्ड अन् उषा व्हान्स.. अमेरिकन राजकारणात भारतीयांचे वाढले महत्व

खेळाडूंनी MS Dhoni कडून बरंच काही शिकायला हवं; पाकिस्तानच्या माजी खेळाडूकडून कौतुक अन् गौतम गंभीरबद्दल म्हणाला...

Ashok Chavan: मी जिवंत राहिलो तरच तुम्ही जिवंत राहणार; आशोक चव्हाणांची भावनिक साद

अभिनेता दर्शनला जेलमध्ये दिसलं रेणुकास्वामीचं भूत; पहाटे जोरजोरात ओरडू लागला अभिनेता, पोलीस म्हणतात-

SCROLL FOR NEXT