e-bike sakal
मुंबई

Mumbai News : मुंबईत बेस्टच्या १ हजार इलेक्ट्रिक बाईकच्या सेवेची भर

प्रीमिअर सेवा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून मिळणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील वाहतुकीच्या सेवेमध्ये आता इलेक्ट्रिक स्कुटरची भर पडणार आहे. बेस्ट विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रमाकडून ही सेवा पुरविण्यात येणार आहे. तब्बल एक हजार इलेक्ट्रिक दुचाकींची भर बेस्टच्या ताफ्यात पडे. मुख्यत्वेकरून पश्चिम उपनगरात ही सेवा देण्याचा बेस्टचा मानस आहे. याआधी बेस्टने ७०० दुचाकी मुंबईत उपलब्ध करून दिल्या आहेत. या दुचाकीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बेस्ट उपक्रमाकडून या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली.

मुंबईतील पश्चिम उपनगरात ही सेवा पुरवण्याचा बेस्ट उपक्रमाचा मानस आहे. ही इलेक्ट्रिक विद्युत दुचाकीची सेवा ही अंधेरी, विलेपार्ले, खार, सांताक्रूझ, जुहू, वांद्रे, माहीम आणि दादर या परिसरामध्ये पुरविण्यात येणार आहे. साधारणपणे प्रतितास २५ किलोमीटर इतका दुचाकीचा वेग असणार आहे. मुंबईतील प्रमुख बसथांबे, व्यावसायिक क्षेत्रे, निवासी क्षेत्रांना जोडण्याचा बेस्ट उपक्रमाचा प्रयत्न आहे. वोगो अॅपवर नोंदणी करून बेस्टच्या इलेक्ट्रिक दुचाकीची सेवा वापरण्यात येणार आहे. याआधीही बेस्ट उपक्रमाने दुचाकीची सेवा मुंबईत उपलब्ध करून दिली आहे. या दुचाकींचेही मुंबईकरांनी स्वागत केले आहे.

बेस्टची प्रीमियम सेवा लवकरच

बेस्ट उपक्रमाकडून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेस्टच्या माध्यमातून प्रीमियम बसची सेवा ठाणे, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि पवई यासारख्या कॉर्पोरेट क्षेत्रासाठी देण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही सेवा सुरू करण्यात येईल असे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले आहे. या सेवेच्या माध्यमातून अधिक आरामदायी आणि सुलभ सेवा बेस्टच्या ग्राहकांना देण्याचा मानस आहे. या सेवेसाठी अतिरिक्त पैसे आकारण्यात येतील. परंतु वक्तशीर, वातानुकुलित आणि आरामदायी सेवा देण्याचा मानस असल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT