toll  sakal
मुंबई

Mumbai News : आठ वर्षांपूर्वी १२ टोल नाके बंद ५३ नाक्यावर सूट

उद्योजकांस ७९८.४४ कोटी रुपयाचा परतावा आणि दिली नुकसान भरपाई; माहिती अधिकारात माहिती आली पुढे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रातील टोल वसुली विरोधात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठ वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेल्या टोल आणि उद्योजकांना दिलेल्या नुकसान भरपाई ची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१६ बंद केलेले १२ आणि ५३ नाक्यावर सूट दिल्यामुळे उद्योजकांस ७९८.४४ कोटी रुपयाचा परतावा आणि नुकसान भरपाई दिली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील ३८ टोल नाक्यापैकी ११ टोल बंद केल्यामुळे २२६.५१ कोटी रुपये परतावा रक्कम आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचेकडील ५३ टोल नाक्यापैकी १ टोल नाका बंद झाला त्यासाठी परतावा रक्कम १६८ कोटी रुपये आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरित १९ प्रकल्पावरील २७ टोल नाक्यांवर कार,

जीप तसेच एसटी आणि स्कूल बसेसना टोल टैक्समध्ये सूट दिल्यामुळे उद्योजकास वर्ष २०१५-१६ करीताची भरपाई रक्कम १७९.६९ कोटी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील १२ प्रकल्पावरील २६ टोल नाक्यांवर कार, जीप तसेच एसटी आणि स्कूल बसेसना टोल टैक्समध्ये सूट दिल्यामुळे उद्योजकास वर्ष २०१५-१६ करीताची भरपाई रक्कम २२४.२४ कोटी रुपये असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात पुढे आणली आहे.

बंद टोल नाका

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचेकडील पैकी १ टोल नाका बंद झाला. चंद्रपूर येथील रेल्वे ओव्हर ब्रिज तडाली (आरओबी) बंद झाला असून त्यासाठी एक रक्कमी १६८ कोटी रुपये दिले गेले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३८ पैकी ११ टोल नाका बंद केले गेले त्यात अलिबाग-पेण-खोपोली, पुण्यातील मावळ येथील वडगाव-चाकण-शिक्रापूर प्रकल्पातील २ टोल नाका, मोहोळ-कुरुळ-कामती-मंद्रुप, सोलापूर येथील टेंभूर्णी -कुर्डूवाडी-बार्शी लातूर वाडी, अहमदनगर करमाळा- टेंभूर्णी रस्ता, नाशिक-वणी रस्ता , भुसावळ येथील यावल फैजपूर रस्ता आणि खामगाव वळण रस्ता अशी नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT