मुंबई

Railway News: मध्य रेल्वेवर ३६ तासांचा ब्लॉक; ६९ मेल- एक्सप्रेस गाड्या रद्द!

या ब्लॉककालावधीत सीएसएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद असणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: सीएसएमटी स्थानकात २४ डब्यांचा रेल्वे गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १० -११ च्या विस्तारीकरासंदर्भात प्री नॉन- इंटरलॉकिंग काम सुरु आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून तब्बल ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

हा ब्लॉक ३१ जून शुक्रवारी मध्य रात्री १२.३० ते २ जून रविवारी दुपारी १२.३० वाजेपर्यत ब्लॉक घेण्यात येणार आहे. याब्लॉकमुळे ६९ मेल- एक्सप्रेस गाड्या रद्द असणार आहे. तर ५० पेक्षा जास्त मेल- एक्सप्रेस गाड्या दादर, ठाणे स्थानकांवर शॉर्टटर्मिनेट आणि शॉर्ट ओरिजिनेट करण्यात येणार आहे. या ब्लॉककालावधीत सीएसएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद असणार आहे.

स्थानक - सीएसएमटी ते भायखळा

मार्ग- अप धीमा, अप-डाउन जलद,

स्थानक -- सीएसएमटी ते वडाळा

----------------

वेळ- शुक्रवारी ३१ मे च्या रात्री १२.३० ते रविवारी २ जून दुपारी १२.३० वाजेपर्यंत

एकूण ब्लॉक कालावधी - एकूण ३६ तास

………

३१ मे रोजी रद्द मेल/एक्स्प्रेस-

१२७०२ हैद्राबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्सप्रेस, १२११२ अमरावती-सीएसएमटी एक्सप्रेस, १७४१२ कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्सप्रेस, १२२९० नागपूर-सीएसएमटी दुरान्तो एक्सप्रेस, १२२६२ हावडा-सीएसएमटी दुरान्तो एक्सप्रेस, १७६११ नांदेड-सीएसएमटी राज्य राणी एक्सप्रेस गाड्या ३१ मे २०२४ रोजी रद्द असणार आहे.

--------

१ जून रोजी रद्द मेल-एक्सप्रेस-

११००९-१० सीएसएमटी- पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस, १२१२३-२४ सीएसएमटी- पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्सप्रेस,१२११० मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेस, १२१२६-२७ सीएसएमटी- पुणे-सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस,२०७०५-०६ सीएसमटी- जालना-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस, ११०१२ धुळे-सीएसएमटी एक्सप्रेस, १२०७२ जालना-सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस, ११००७-०८ सीएसएमटी- पुणे-सीएसएमटी डकेक्न एक्सप्रस, १२१२८ पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस, १७६१७-१८ सीएसएमटी- नादेड-सीएसएमटी तपोवन एक्सप्रेस, २२२२५-२६ सीएसएमटी-सोलापूर-सीएसएमटी वदे भारत एक्सप्रेस,२२२३० मडगाव-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस, २२२२३-२४ सीएसएमटी-साई नगर शिर्डी- सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस, २२११९-२० सीएसएमटी- मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस, १२७०२ हैद्राबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्सप्रेस, १७४११-१२ सीएसएमटी- कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्सप्रेस, १७६११-१२ सीएसएमटी- नादेड-सीएसएमटी राज्यराणी एक्सप्रेस, १२१८७ जबलपूर-सीएसएमटी गरीब रथ एक्सप्रेस रद्द असणार आहे.

२ जून रोजी रद्द मेल-एक्सप्रेस

२२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस, ११०१० पुणे-सीएसएमटी सिहंगड एक्सप्रेस, १२१२४ पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्सप्रेस, १२११० मनमाड-सीएसमटी पंचवटी एक्सप्रेस, १२१२६ पुणे-सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस,२०७०५ जालना-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस, ११०१२ धुळे-सीएसएमटी टर्मिनस,११००८ पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस, २२२२६ सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस,२२२२९ सीएसमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, १७६१७ सीएसएमटी –नांदेड तपोवन एक्सप्रेस, २२११९ सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेस, २२२२३ सीएसएमटी-साई नगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस,१२१२७ सीएसएमटी-पुणे प्रगती एक्सप्रेस, ११००७ सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्सप्रेस,११०११ सीएसएमटी धुळे एक्सप्रेस, १२७०१ सीएसएमटी –जालना जनशताब्दी एक्सप्रेस, २०७०६ सीएसएमटी-जालना वंदे भारत एक्सप्रेस,१२१८८ सीएसएमटी-जबलपूर गरीब रथ एक्सप्रेस, २२२२५ सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस, १२१२५ सीएसएमटी-पुणे प्रगती एक्सप्रेस, १२२६१ सीएसएमटी- सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस, १२१२५ सीएसएमटी-पुणे प्रगती एक्सप्रेस,१२२६१ सीएसएमटी-हावडा दुरान्तो एक्सप्रेस,११००९ सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्सप्रेस, १७६१२ सीएसएमटी-नांदेड राज्य राणी एक्सप्रेस.

------------------

दादर स्थानकात अंशत: रद्द होणार मेल-एक्स्प्रेस-

११०५८ अमृतसर- सीएसएमटी एक्सप्रेस, २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस, ११०२० भुबनेश्र्वर-सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस आणि १२८१० हावडा-सीएसएमटी मेल एक्सप्रेस,२२१०८ लातूर-सीएसएमटी एक्सप्रेस, ११४०२ आदिलाबाद-सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस, २२१५८ चेन्नई- सीएसएमटी एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, पंजाब मेल एक्सप्रेस, नागपूर-सीएसएमटी दुरांतो एक्सप्रेस सारख्या मुंबई येणाऱ्या अनेक मेल एक्सप्रेस गाड्या दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. तर काही मेल- एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि पुणे , नाशिक स्थानकांवर शॉर्टटर्मिनेट करण्यात येणार आहे.

-----------

दादरहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या -

२२१७७ सीएसएमटी- वाराणसी एक्सप्रेस,१२०५१सीएसएमटी- मडगांव जनशताब्दी एक्सप्रेस,२२२२९ सीएसएमटी- मडगांव वंदे भारत ट्रेन,२२१०५ सीएसएमटी- पुणे इंद्रायणी एक्सप्रेस,१२८५९ सीएसएमटी- -हावडा गीताजंली एक्सप्रेस,१२५३४ सीएसएमटी- लखनऊ पुष्पक एक्सप्रेस,१२८६९ सीएसएमटी- हावडा एक्सप्रेस,२२१५९ सीएसएमटी- चेन्नई एक्सप्रेस,११०१९ सीएसएमटी- भुबनेश्र्वर कोणार्क एक्सप्रेस, २२७३२ सीएसएमटी-हैदराबाद एक्सप्रेस,२२२२१ सीएसएमटी- निझामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, ११४०१ सीएसएमटी- आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, १२१०५ सीएसएमटी- गोंदिया विदर्भ एक्सप्रेस या गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर स्थानकातून सुटणार आहे. तर काही गाड्या पनेवल,पुणे आणि नाशिक स्थानकातून सुटणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT