मुंबई, ता. 15 : हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकात माथेफिरू शिरल्याची घटना आज ( सोमवार, ता.15) रोजी घडली. माथेफिरूकडे लांब आकाराचे धारदार शस्त्र होते. तसेच तो नशेत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी शिवडी स्थानकातील स्थानक प्रबंधक कार्यालयाची नासधूस करून स्वतःवरच वार केले. या माथेफिरू विरोधात वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.
आज सकाळी गर्दीच्या वेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना स्थानकात आणि लोकलमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सकाळी 8:20 च्या सुमारास शिवडी येथे राहणारा आरोपी बावीस वर्षीय नावेद खान याने स्थानकात प्रवेश केला.
महत्त्वाची बातमी : शेतकऱ्यांनो सावधान, राज्यात वादळी अवकाळी पावसाची शक्यता; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा
शिवडी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 वर कर्तव्यावर पोलिस शिपाई निलेश जगदाळे होते. यावेळी माथेफिरूने जगदाळे याला 'ए मामा' अशी ओरडून हाक मारली. यावेळी त्याला काय झाले, असे पोलिसाने विचारले. त्यावेळी माथेफिरूने अरेरावीची भाषा वापरली. पोलिसाला याला शिवीगाळ केली व त्याने कमरेला चाकू असल्याचे दाखवले. पोलिसाने विचारले, कंबरेला काय आहे. त्यावर त्याने चाकू काढून दाखवला.
'काट दूंगा, मेरे चाकू को हात मत लगाना' असे तो म्हणाला. पोलिसाने त्याला शांत करण्याचा समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने अरेरावीची भाषा केली, शिवीगाळ केली. यावर पोलिस त्याला स्टेशन प्रबंधकाच्या कार्यालयात बंद केले. यासह वडाळा पोलिस ठाण्याला संपर्क साधला. यावेळी चिडलेल्या माथेफिरूने रेल्वेची संपत्ती असलेल्या टेबलावरची काच फोडली. फोडलेल्या काचेवर आपले डोके आपटले. भिंतीवरील पंखा, दोन मॉनिटर तोडून नुकसान केले. यासह माथेफिरूने हातातील काच पोलिसाच्या अंगावर फेकली. त्यामुळे कर्तव्यावरील पोलिसाची पॅन्ट फाटली.
महत्त्वाची बातमी : 24 पर्यंत अटक न करण्याचे निर्देश; बिल्डर अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा
वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्यांच्या मदतीने माथेफिरुस ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे, अशी माहिती वडाळा रेल्वे ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी दिली.
mumbai news armed and drunk man attacked on duity cop on shivadi station
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.