मुंबई

सावधान ! मुंबईत 17 टक्के रुग्ण वाढले, कोरोना व्हायरस झाला पुन्हा ऍक्टिव्ह

भाग्यश्री भुवड

मुंबई, 19: मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना विषाणू पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील रुग्णांची वाढती संख्या पाहता असे दिसते की कोरोनाची तिसरी लाट आली आहे. आठवड्यात महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत 30 टक्के आणि मुंबईत 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोविड नियमांचे पालन करण्यासाठी नागरिक कुचराई करत आहेत, त्यामुळे प्रकरणे वाढली आहेत. 

रुग्णांची वाढती संख्या पाहून आता आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 12 फेब्रुवारी रोजी राज्यात 31 हजार 474 सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती. ती गुरुवारपर्यंत वाढून 40 हजार 858 झाली आहे. पालिका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 12 फेब्रुवारीला मुंबईत सक्रिय रूग्णांची संख्या 5 हजार 296 होती, जी गुरुवारी वाढून 6 हजार 201 झाली आहे. 

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, नवीन रुग्णांची संख्या वाढल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णसंख्येत वाढ होण्यामागची अनेक कारणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने लोकल ट्रेनमध्ये सामान्य लोकांना प्रवासाची मूभा, परदेशातून आणि इतर राज्यांतून येणाऱ्या लोकांची वाढती संख्या आणि लोकांचा बेजबाबदारपणा ही प्रमुख कारणे आहेत. 

पाॅझिटिव्हीटी दर ही वाढले - 

महाराष्ट्रासह मुंबईतही कोरोना पाॅझिटिव्ह होणाऱ्यांचा दरही वाढला आहे. गेल्या सात दिवसात राज्याचा पाॅझिटिव्ह दर 6.73 टक्क्यांवरून 9.48 टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत तर पॉझिटिव्हीटीचे प्रमाण 3.59 टक्क्यांवरून 4.28 टक्क्यांवर गेले आहे. 

पालिकेला दाखवावा लागणार कडकपणा - 

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे कमी झाल्यानंतर लोक बेफिकीर झाले आहेत. मास्क न घालणे, सामाजिक अंतरांचे अनुसरण न करणे आणि इतर कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण न करणे हे स्वत: साठी आणि इतरांसाठी घातक ठरू शकते. कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण न करणाऱ्यांबरोबर आता पालिकेने कठोरपणे व्यवहार केला पाहिजे असं वैद्यकीय सल्लागार असोसिएशनचे (एएमसी) अध्यक्ष डॉ. दीपक बैद म्हणालेत.

लग्न, मेजवानी आणि फिरण्यामुळे वाढली प्रकरणे - 

मी अलीकडे असे बरेच रुग्ण पाहिले आहेत जे लग्नासाठी, मेजवानीसाठी किंवा बाहेर पडण्यासाठी गेले होते. जेव्हा ते परत आले तेव्हा ते कोरोनाच्या सापळ्यात सापडले होते. बरेच लोक गर्दी असलेल्या धार्मिक ठिकाणी देखील जात आहेत, अशा परिस्थितीत काही लोक संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत आणि व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. मुंबईकरांनी सध्या गर्दीच्या ठिकाणांपासून दूर रहावे आणि जास्त गर्दी करु नये, असं  बॉम्बे रुग्णालय समन्वयक खासगी कोविड रुग्णालय आणि फिजीशियन डाॅ. गौतम भन्साळी म्हणालेत. 

mumbai news corona once again active in mumbai 17 percent rise recorded in patient count

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT