मुंबई 20 : कोरोनाचा जोर मुंबईसह राज्यात वाढत असताना दुसऱ्या टप्प्याच्या कोरोना लाटेत गेल्या दोन दिवसात चार मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे म्हणजे गेल्या 10 महिन्याच्या कोरोना काळात रात्रंदिवस दौरे, भेटीगाठी करुनही हे नेते कोरोना पाॅझिटिव्ह झाले नव्हते. शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत.
महत्त्वाची बातमी : सावधान ! मुंबईत 17 टक्के रुग्ण वाढले, कोरोना व्हायरस झाला पुन्हा ऍक्टिव्ह
कोरोना काळात अत्यंत जबादारीने कोरोना परिस्थिती हाताळणारे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यानंतर आता राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी देखील कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आल्याची माहिती दिली. तर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर, भाजप खासदार रक्षा खडसे या ही कोरोना पॉझिटीव्ह निघाल्या आहेत.
महत्त्वाची बातमी : अभिनेता विवेक ओबेराय विरोधात दंडात्मक कारवाई, गुन्हा दाखल होण्याची शक्यता
राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांची चाचणी पॉझिटीव्ह झाल्याचे ट्विटरवरून जाहीर केले आहे. जयंत पाटील यांनी गेल्या 10 महिन्यात बरेचसे दौरे केले. सध्या ते जनसंपर्क यात्रेवर होते, त्या अंतर्गत त्यांनी नुकताच विदर्भाचा दौरा केला. त्यानंतरच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच आता कोरोनाचा विळखा हा झपाट्याने पसरत आहे असे म्हणावे लागेल.
mumbai news four ministers detected corona positive in last two days
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.