मुंबई

मोठी राजकीय उलथापालथ ! भाजपच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हातावर बांधलं शिवबंधन, मनसे नेत्याही सेनेत

सुमित बागुल

मुंबई : भाजप नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. कृष्णा हेगडे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या सकाळपासूनच उधाण आलं होतं.

आज संध्याकाळी कृष्णा हेगडे हे वमुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहचले. त्यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं होतं.

दरम्यान हातावर शिवबंधन बांधत कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केलाय. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा हेगडे हे भाजपमध्ये अस्वस्थ असल्याचं सांगण्यात येतंय.

कोण आहेत कृष्णा हेगडे ?

  • कृष्णा हेगडे काँग्रेसचे पार्ले विधानसभा मतदार संघातून आमदार राहिलेत
  • शिवसेनेच्या विनायक राऊत यांना त्यांनी निवडणुकीमध्ये हरवलं होतं
  • माजी महापौर रमेश प्रभू यांचे हेगडे जावई हे आहेत
  • काँग्रेसमधून हेगडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता
  • त्यानंतर आता कृष्णा हेगडे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कृष्णा हेगडे हे तेच भाजपचे नेते आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे प्रकरणात त्यांची बाजू घेतली होती. आज कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला आहे. कृष्णा हेगडे  यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पार्ल्यातील संघटना बांधणीत शिवसेनेला त्यांची मदत होणार असल्याचं म्हटलं जातंय. 

शिवसेनेचा विले पार्ल्यात भाजप आणि मनसेला डबल धक्का

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत विले पार्ल्याचे माजी आमदार कृष्णा हेगडे आणि २०१९च्या विले पार्ले विधानसभेतील मनसेच्या उमेदवार जुईली शेंडे यांनी देखील शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी परिवाहन मंत्री अनिल परब, युवासेना सचिव वरूण सरदेसाई उपस्थित होते.

krushna hegade bjp leader who supported dhanjay munde joined shivsena at varsha

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'

Latest Maharashtra News Updates live : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये ५ नक्सलवाद्यांचा खात्मा

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे सोपे मार्ग: भारतातील ९ सर्वात सोप्या सरकारी परीक्षा

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

SCROLL FOR NEXT