Ferivale  sakal
मुंबई

Mumbai News : फेरीवाल्यांच्या मुजोरीचा होत आहे स्थानिक नागरीकांना त्रास !

Mumbai News : फेरीवाल्यांनी पुन्हा पदपथावर अतिक्रमण केले

सकाळ डिजिटल टीम

Mumbai News : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असा नावलौकिक असलेल्या तुर्भे येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ, भाजी, मसाला, धान्य मार्केट परिसराला फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. एपीएमसी प्रशासन तसेच महापालिकेकडून या फेरीवाल्यांना अभय मिळत असल्याने फेरीवाल्यांनी पदपथांबरोबरच थेट रस्त्यांवरही अतिक्रमण केले आहे.

सानपाडा रेल्वे स्थानक ते एपीएमसी मार्गावर काही महिन्यांपासून फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला आहे. येथील फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने या मार्गावर फेरीवाल्यांनी कब्जाच केल्याचे दिसत आहे.

त्यामुळे एपीएमसी फळ मार्केट ते भाजी मार्केट या मार्गावरील पदपथांवर चालणे देखील पादचाऱ्यांना कठीण झाले आहे. तर सिटी मॉल ते एपीएमसी सिग्नलच्या सर्व्हिस रोडवर कांदे बटाटे विक्रेते तसेच केशकर्तनालयाची दुकाने थाटण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे, या ठिकाणच्या फेरीवाल्यांमुळे हा पदपथ नागरीकांना ये-जा करण्यासाठी उपलब्ध करून दिला जात नसल्याची नोंद मानव अधिकार आयोगाने देखील घेतली आहे. त्यावेळी तुर्भे विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याचे फोटो आयोगाला सादर केले होते. पण त्यांनतर पुन्हा या फेरीवाल्यांने पदपथावर अतिक्रमण केले असल्याने महापालिकेच्या कारवाईलाही हे फेरीवाले जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

फेरीवाल्यांच्या मालासाठी सुरक्षारक्षक तैनात

या ठिकाणी प्रत्येक विक्रेत्याकडे वीस ते पंचवीस गोणी कांदा तसेच बटाटा साठवून ठेवलेला असतो. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी कोणी हा माल चोरून नेऊ नये यासाठी सुमारे १५ हजार रुपये सुरक्षारक्षकावर खर्च करून या मालाची रखवाली केली जाते.

भाजी मार्केटच्या विरुद्ध बाजूकडील रस्ता ते माथाडी भवन चौकापर्यंत १५ ते २० कांदे बटाटे विक्रेत्यांची टेम्पो लागलेले असतात. यावर महापालिका, वाहतूक पोलिस, एपीएमसी पोलिस ठाणे यांच्याकडून दुर्लक्ष केले जाते.

किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ

एपीएमसी सिग्नल ते भाजीपाला मार्केट जावक गेट, याच जावक गेटच्या विरुद्ध बाजूचा सर्व्हिस रोड, माथाडी भवन ते जलाराम मार्केट चौक, सानपाडा हायवे सिग्नल ते एपीएमसी सिग्नल या ठिकाणी फेरीवाल्यांनी पदपथावर बस्तान मांडले आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये येणारे कामगार, पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे.

परिणामी, अनेकदा किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात झाल्याचेही समोर आले आहे. महापालिका तक्रार आली की कारवाई करते. त्यानंतर फेरीवाले पुन्हा पदपथ आणि रस्ते बळकावून या कारवाईला भीक घालत नसल्याचे कृतीतून दाखवत असून पालिका अधिकाऱ्यांकडून देखील दुर्लक्ष केल्याने रहिवाशांना त्रास होत आहे.(Latest Marathi News)

एपीएमसीसह इतर ठिकाणी पदपथांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर दैनंदिन कारवाई केली जाते. तसेच फेरीवाले बसू नये, यासाठी सुरक्षा रक्षक देखील तैनात केले जातात.

-भरत धांडे, सहाय्यक आयुक्त, तुर्भे विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मध्ये कोट्यवधींचा घोटाळा, RTIकडून खुलासा, ट्विट करत काँग्रेस नेत्याचे महायुतीवर टीकास्त्र

Shri Thanedar: ट्रम्प लाट असूनही मराठमोळ्या नेत्याने उधळला विजयाचा गुलाल! दुसऱ्यांदा बनले अमेरिकेचे खासदार, कोण आहेत श्री ठाणेदार ?

"तो सेटवर खूप..." अक्षय कुमारच्या सहकलाकाराचा खळबळजनक खुलासा ; "त्याच्या दोन-तीन गर्लफ्रेंड्स..."

USA Election 2024: राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! सोशल मीडियावर मिम्सचाही पाऊस

Latest Marathi News Updates live: महाविकास आघाडीच्या सभेत जयस्तुते गाण्याच सादरीकरण

SCROLL FOR NEXT