मुंबई

Maharashtra Budget 2021 : अर्थमंत्री अजित पवारांनी बजेटमध्ये मुंबईबद्दल मांडलेले २० महत्वाचे मुद्दे

सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. गेलं वर्ष कोरोनामध्ये गेल्याने राज्याचं आर्थिक गणित कोलमडले आहे. अशात अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मनाला जातोय. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरचा हा राज्याचा दुसरा अर्थसंकल्प आहे. आजच्या अर्थसंकल्पात मुंबईबाबत काय म्हणालेत अर्थमंत्री अजित पवार. 

  1. मुंबई शहरात वाहतूक सुविधा जागतिक दर्जाच्या असाव्यात असं राज्य सरकारचे ध्येय आहे.
  2. त्याअंतर्गत शिवडी नाव्हा शेवा प्रकल्प सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न 
  3. वांद्रे वरळी सागरी मार्ग नाव्हा शेवा मार्गाला जोडण्यासाठी वरळी ते शिवडी या चारपदरी महामार्गाचे काम सुरु झाले आहे. हे काम तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे 
  4. विरार, भिवंडी, कल्याण, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या शहरांच्या विकासासाठी आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, नवी मुंबई विमानतळ आणि शिवडी नाव्हा शेवा मार्गाला जोडणाऱ्या १२६ किलोमीटर लांबीच्या विरार ते  अलिबाग मल्टिमॉरल कॉरिडॉरच्या भूसंपादनाचे महाराष्ट्र सरकारच्या राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरु आहे. 
  5. ठाणे खाडीला समांतर सुमारे १५ किलोमीटर लांबीचा ठाणे कोस्टल रोड उभारण्यात येत असून त्यासाठी १ हजार २५० कोटी खर्च अपेक्षित आहे 
  6. मुंब्रा बायपास जंक्शन, शीळ कल्याण फाटा, शीळ फाटा आणि कल्याण जंक्शन यावर उड्डाण पुलांची निर्मिती, महामार्गाचे रुंदीकरण तसेच कल्याण फाटा अंडरपासचे काम प्रगतीपथावर  
  7. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांच्या बाजूच्या जलमार्गाचा वाहतुकीसाठी वापर करण्याचं शासनाने ठरविले आहे. त्यामध्ये पहिल्या टप्पयात वसई ते कल्याण या मार्गावर वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. यासाठी कोलशेत, काल्हेर डोंबिवली आणि मीरा भाईंदर या चार ठिकामी जेट्टी उभारण्यात येणार आहे
  8. वांद्रे ते वरळी सागरी सेतूचे काम सुरु झालेले आहे 
  9. मुंबईतील १४ मेट्रो प्रकल्पांचे ३३७ किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासाठी १ लाख चाळीस हजार ८१४ कोटी खर्च अपेक्षित आहे 
  10. मुंबईतील सर्व १४ मेट्रो प्रकल्पांची कामे पूर्णत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ यावरील काम २०२१ मध्ये पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.  
  11. गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची किंमत ६ हजार ६०० कोटी रुपये असून कामाची निविदाविषयक कार्यवाही सुरु आहे 
  12. मुंबई कोस्टल रोडचे काम जलद गतीने सुरु असून हा मार्ग २०२४ पूर्वी पूर्ण करण्याचं नियोजन आहे 
  13. मुंबई शहरातील रेल्वे रुळावरील सात उड्डाण पुलांचे काम सध्या सुरु आहेत. 
  14. बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद 
  15. वांद्रे कुर्ला संकुलातील सिटी पार्क ते महाराष्ट्र निसर्ग उद्यानादरम्यान पादचारी पूल बांधण्यात येणार. त्यासाठी ९८ कोटी ८१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे 
  16. मुंबईतील पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावर मुंबई महानगर क्षेत्र विकास महामंडळा मार्फत स्वतंत्र सायकल ट्रॅक उभारण्यात येणार 
  17. BMC च्या माध्यमातून वरळी, वांद्रे  भांडुप  वर्सोवा आणि मालाड येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा निर्णय आणि त्याकरता १९ हजार ५०० कोटी रुपये अपेक्षित आहे. 
  18. समुद्राचं पाणी गोडं करण्याचा प्रकल्प मालाडमध्ये मनोरी येथे उभारण्याचे प्राथमिक सर्वेक्षण झालेले आहे. याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल २०२१ डिसेंबर आधी सादर केला जाईल.   
  19. मिठी नदी पुनरुजीविकरण प्रकल्प मार्च २०२१ पासून सुरु होणार आहे. त्यासाठी ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.  
  20. दहिसर बोईसर आणि ओशिवरा नदी पुनरुजीविकरणासाठी १ हजार ५५० कोटींची कामे सुरु

mumbai news maharashtra budget 2021 pointers and projects about mumbai MMR region

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT