मुंबई

रेल्वे स्टेशनवर येईल विमानतळाचा फील, मुंबई सेंट्रलच्या प्रतिक्षालयाचा होणार कायापालट

कुलदीप घायवट

मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक किंवा अन्य कारणास्तव विमानतळावर जाण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे विमानतळावरील सुखसोयी, अत्याधुनिक सुविधांचा अनुभव सर्वसामान्य प्रवाशांना मिळत नाही. भारतीय रेल्वे आणि रेल्वे मंत्रालय यांच्यावतीने प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्यासाठी भर दिला जात आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आणि उत्तम होण्यासाठी  स्थानके अद्ययावत केली जाण्याची योजना आहे. विमानतळाच्या धर्तीवर प्रवाशांना रेल्वे स्थानकावर सुखसोयी देण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल स्थानकात आधुनिक प्रतीक्षालय उभारणार आहे. त्यातून पश्चिम रेल्वेला लाखो रुपयांचा महसूल मिळणार आहे.

मेल किंवा एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उत्तम सुविधा मिळाव्या. यासाठी पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात अत्याधुनिक प्रतीक्षालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पश्‍चिम रेल्वेने एका खासगी कंपनीशी पाच वर्षांचा करार केला आहे. या माध्यमातून पश्चिम रेल्वेला प्रतिवर्षी 18 लाख 89 हजार 240 रुपये, तर 5 वर्षात 1 कोटी 43 हजार 822 रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. हे आधुनिक प्रतीक्षालयाला बांधण्यासाठी अंदाजे 62 लाख 45 हजार 741 रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे प्रवाशांना विमानतळावर असल्याचा भास होणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून मिळाली आहे.

मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर येथे अत्याधुनिक प्रतीक्षालय सुरू करण्यात आले होते. आता, पश्चिम  रेल्वे आपल्या प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी अनेक प्रयोग करत आहेत. मुंबई सेंट्रल स्थानकात आधुनिक प्रतीक्षालय लवकरच उभारणार येणार आहे.

या प्रतीक्षालयात अत्याधुनिक सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. ज्या प्रमाणे मुंबई विमानतळावर प्रवाशांना आगमन व निर्गमन विमानांची माहिती मिळावी, यासाठी स्क्रीन लावण्यात आले आहेत. प्रतीक्षालयतही याच प्रकारची सुविधा असेल. प्रवाशांना मेल किंवा एक्स्प्रेस गाड्यांची माहिती मिळावी म्हणून एलसीडी स्क्रीन बसवण्यात येतील. तसेच प्रवाशांना गाड्यांची माहिती मिळावी यासाठी तेथे उद्घोषणा यंत्रणाही बसविण्यात येणार आहे.

महत्त्वाची बातमी :  मुंबईत होळी, रंगपंचमी साजरी करण्याचा प्लॅन केलाय? मग हे वाचाच

प्रवाशांना मिळणार आरामदायी सुविधा

या आधुनिक  प्रतीक्षालयात आरामदायी सोफा, डायनिंग टेबल्स, आधुनिक बाथरुम विथ बाथ कीट, वाचनालय, मोबाईल चार्जिंग पॉईट, लॅपटॉप सिटिंग अरेंजमेंट, कॅफे सर्व्हिस, बुफे सर्व्हिस, ट्रॅव्हल कीट, वायफाय, रेल्वे गाड्यांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी उद्धोषणा यंत्रणा, एलईडी स्क्रीनवर आगमन-प्रस्थान करणार्‍या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक अशा सुविधा या प्रतीक्षालयात प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मात्र या प्रतीक्षालयाच्या सुविधेसाठी प्रवाशांना शुल्क मोजावे लागणार आहे. 

mumbai news makeover of mumbai central station waiting romm will now look like airport

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT