मुंबई,ता. 4 : राज्यात नैसर्गिक आपत्ती ठरतेय जीवघेणी ठरत असून पूर, उष्मा आणि विजपडून अनेकांचे मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्र सोबतच आणखी सहा राज्यांचा समावेश आहे. पृथ्वी विज्ञान आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातील शास्त्रज्ञांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठासह केलेल्या संयुक्त अभ्यासात हा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे.
संयुक्त अभ्यासात कोणत्या राज्यांना नैसर्गिक आपत्तीचा अधिक फटका बसतो याचा संयुक्तपणे अभ्यास करण्यात आला. महाराष्ट्रासह ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश, आसाम आणि बिहार राज्यांचा समावेश असून तिथे देखील मृत्युदर अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाची बातमी : अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेली 'ही' मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे
या संयुक्त अभ्यासात 1970 ते 2019 दरम्यान झालेल्या 7,063 महत्वाच्या नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास करण्यात आला. या आपत्तींमध्ये 1,41,308 लोकांनी आपला जीव गमावला होता. मात्र देशभरातील या आपत्तींमध्ये केवळ 0.038 टक्के मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देशभरात झालेल्या विनाशकारी नैसर्गिक आपत्तींमध्ये अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. अशा आपत्तींमुळे 99 बिलियनचे आर्थिक नुकसान झाले. त्यात 60 बिलियन पूर तर 22 बिलियन चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे.
महापूरामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्या खालोखाल उष्माघात आणि वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे अभ्यासात समोर आले आहे. या अभ्यासातील निष्कर्ष 'जर्नल वेदर अँड क्लायमेट एक्सट्रीम ऑफ सायन्स डायरेक्ट या मासिकात या मासिकात प्रकाशित झाला आहे.
वातावरणातील तीव्र बदलामुळे आतापर्यंत सर्वाधिक 46.1 टक्के मृत्यू झाले आहेत. मध्य भारतात मुसळधार पडणारा पाऊस हे त्याचे मुख्य कारण असून यासाठी 1050 ते 2000 पर्यंतच्या मुसळधार पावसाचा अभ्यास करण्यात आला.
महत्त्वाची बातमी : दुसऱ्या डोस घेतल्यानंतर लगेचच भिवंडीत नागरिकाचा मृत्यू, लसीनेच घेतलाय का सुखदेव यांचा बळी ?
हवामान विभागाचे आधुनिकीकरण तसेच अत्याधूनिक यंत्रणा यांमुळे हवामानाचा अचूक अंदाज सांगण्यात बरीच मदत मिळत आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींमधील जीवितहानी कमी करण्यात यश आले आहे. त्यामुळे गेल्या 10 वर्षात चक्रीवादळ 94%, महापूर 48.5% आणि शितलहरींमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये 17.1% घट झाली आहे.
महत्त्वाची बातमी : दुसऱ्या डोस घेतल्यानंतर लगेचच भिवंडीत नागरिकाचा मृत्यू, लसीनेच घेतलाय का सुखदेव यांचा बळी ?
मात्र गेल्या पन्नास वर्षात उष्माघात आणि वीज कोसळण्याच्या घटनांतील मृत्यूचे प्रमाण वाढले असून अनुक्रमे 62.2 % आणि 52.8 टक्के वाढ झाली आहे.
mumbai news natural calamities causing more deaths and incidents are increasing day by day
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.