underground waste bins 
मुंबई

Mumbai News : आता रुग्णालयातच कचऱ्याची विल्हेवाट; ४ रुग्णालयात १५ भूमिगत कचरा पेट्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - आता पालिकेच्या रुग्णालयातील कचऱ्याची विल्हेवाट त्याच ठिकाणी लावणे शक्य होणार आहे. मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, कस्तुरबा व शिवडी येथील टीबी रुग्णालयात या ४ रुग्णालयात १५ भूमिगत कचरा पेट्या बसवण्यात येणार आहेत. एक भूमिगत कचरा पेटी बसवण्यासाठी १५ लाख रुपये पालिका मोजणार आहे. (Latest Marathi News)

मुंबईत दररोज साडेसहा हजार मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होते. ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर घनकचरा व्यवस्थापन विभागाने भर दिला आहे. स्‍वच्छ व सुंदर मुंबई प्रकल्‍प अंतर्गत सन २०३० पर्यंत मुंबई कचरामुक्तीचे उद्दीष्ट ठेवण्‍यात आले आहे. त्‍या अंतर्गत कचरामुक्‍ती व कचरा दुर्गंधीमुक्तीसाठी पालिकेने विविध उपाययोजना राबवल्या आहेत.

कचरापेटीत कचरा टाकल्यानंतर कचरा पुन्हा रस्त्यावर येतो. त्‍यामुळे सार्वजनिक आरोग्‍याचा प्रश्‍न निर्माण होत असल्‍याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्‍यावर पर्याय म्‍हणून मुंबईत विविध ठिकाणी भूमिगत कचरा पेटी बसविण्‍याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. (Marathi Tajya Batmya)

मुंबई शहर विभागातील चार प्रमुख महानगरपालिका रुग्णालयांच्या आवारात मिळून एकूण १५ भूमिगत कचरापेट्या बसविण्‍यात येणार आहेत. त्यासाठी ग्राऊंड पेनेट्रेटींग रडार सर्व्‍हे (जीपीआरएस) करण्‍यात आला आहे. त्यानुसार, परळ येथील राजे एडवर्ड स्‍मारक रूग्‍णालय (केईएम रुग्णालय) (६), शीव येथील लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रूग्‍णालय आणि वैदयकीय महाविद्यालय (४), ऑर्थर रस्‍ता येथील कस्तुरबा रुग्णालय (२) आणि शिवडी येथील क्षयरोग रूग्‍णालय समूह (जीटीबी) रुग्णालय (३) आदी रूग्‍णालयांमध्‍ये भूमिगत कचरापेट्या बसवण्‍यात येणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू करण्‍यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

नियुक्त होणाऱ्या संस्थेला भूमिगत कचरा पेट्यांचा पुरवठा करणे, त्या कार्यान्वित करणे आणि त्यांची देखभाल-दुरूस्‍तीही करावी लागणार आहे. या उपक्रमामुळे महानगरपालिका रुग्णालयांमध्ये निर्माण होणार्‍या कचर्‍याची योग्य पद्वतीने विल्‍हेवाट लावण्यास मदत होईल.

- चंदा जाधव, उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT