sakal
मुंबई

Mumbai News: वर्षभरात महारेराकडे ४३३२ गृहप्रकल्पांची नोंदणी; १९७६ प्रकल्पांचा समावेश

४३३२ प्रकल्पांची नोंदणी केली असून उर्वरित ११३९ प्रकल्पांच्या प्रस्तावांची छाननी सुरू आहे. दरम्यान यामध्ये मुंबई विभागातील सुमारे १९७६ प्रकल्पांचा समावेश आहे |4332 projects have been registered and proposals of remaining 1139 projects are under scrutiny. Meanwhile this includes about 1976 projects in Mumbai division

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: मुंबईसह महाराष्ट्रात निवासी इमारतीची संख्या झपाट्याने वाढत असून नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल ४३३२ नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी झाली आहे.

१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत महारेराकडे नवीन नोंदणीक्रमांकासाठी ५४७२ विकासकांनी अर्ज केला होता. त्यापैकी ४३३२ प्रकल्पांची नोंदणी केली असून उर्वरित ११३९ प्रकल्पांच्या प्रस्तावांची छाननी सुरू आहे. दरम्यान यामध्ये मुंबई विभागातील सुमारे १९७६ प्रकल्पांचा समावेश आहे.

सर्वसामान्य नागरिकांची घर खरेदी करताना फसवणूक होऊ नये, वेळेत घराचा ताबा मिळावा म्हणून महारेराने प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार जिल्हानिहाय नोंदणीचा विचार करता पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ११७२ नवीन प्रकल्पांची नोंदणी झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील ५९७, मुंबई उपनगर ५२८, रायगड ४५०, नागपूर ३३६, नाशिक ३१० अशी नोंदणी केली आहे. दरम्यान मुंबई विभागात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि कोकणाचा समावेश आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्याचा समावेश असलेल्या पश्चिम महाराष्ट्रा १४१५ तर विदर्भात ४३७ प्रकल्पांची नोंदणी केली आहे. त्याचबरोबर नाशिक विभागात ३१० आणि मराठवाड्यात ११७ प्रकल्पांची नोंदणी करण्यात आली आहे.

त्रिस्तरीय पातळीवर छाननी

गृहप्रकल्प आश्वासित वेळेत पूर्ण व्हावेत, घरखरेदीदारांच्या तक्रारी उद्भवू नये यासाठी महारेरा नोंदणीक्रमांक देताना प्रत्येक प्रकल्पाची वैद्यता, आर्थिक आणि तांत्रिक अशा त्रिस्तरीय पातळीवर कठोर छाननी करूनच नोंदणीक्रमांक मंजूर करते.

याशिवाय कल्याण - डोंबिवली भागातील प्रकल्पांतील अनियमिततांच्या पार्श्वभूमीवर शासनाने नोंदणीक्रमांक देण्यापूर्वी संबंधित नियोजन प्राधिकरणांकडून 'बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र' (सीसी) त्यांच्या पदनिर्देशित ईमेल वरून महारेराच्या पदनिर्देशित इ-मेलवर पाठवणे बंधनकारक केलेले आहे. त्याची पूर्तता केल्यानंतरच नोंदणी क्रमांक दिला जातो.

- पुण्यातील १४१३ प्रकल्पांपैकी ११७२, ठाण्यातील ७६५ पैकी ५९७, मुंबई उपनगरातील ६५५ पैकी ५२८, रायगडच्या ५४६ पैकी ४५९, नागपूरच्या ४०४ पैकी ३३६ आणि नाशिकच्या ३८१ पैकी ३१० प्रकल्पांना नोंदणीक्रमांक दिले आहेत. कल्याण - डोंबिवली, वसई- विरार क्षेत्रातील ४४६ प्रकल्पांपैकी ३३२ प्रकल्पांना नोंदणीक्रमांक देण्यात आलेले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT