मुंबई

सचिन वाझे यांचं धक्कादायक Whats App स्टेटस; वाझेंच्या स्टेटसमुळे पोलिस दलातही खळबळ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटके सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. महत्त्वाची बाब म्हणजे ही कार ज्यांच्या नावावर होती त्या मनसुख हिरेन यांचा संस्थयास्पद मृत्यू झाल्यानंतर विधिमंडळात हे प्रकरण चांगलंच गाजलं. यामध्ये प्रामुख्याने नाव पुढे आलं ते तपास अधिकारी सचिन वाझे यांचं. विरोधकांच्या दबावामुळे सरकारला सचिन वाझे यांची बदली करण्याची वेळ आली. अशात मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत सापडलेली कार, मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या घटनांचा संबध मुंबई पोलिस दलातील सचिन वाझे यांच्याशी जोडला जात असताना सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाझेंनी न्यायालयातही दाद मागितली मात्र तिथेही त्यांना अंतरिम जामीन फेटाळला गेला.

दरम्यान सचिन वाझें यांच्या व्हाँट्सअँप स्टेटसमुले मोठी खळबळ उडाली आहे. या स्टेटसच्या शेवटच्या ओळीत वाझेंनी आता निरोप घेण्याची वेळ आली आहे, आता सहन करण्याची क्षमता नसल्याचं लिहिलं आहे. 

सचिन वाझे यांचं धक्कादायक स्टेटस 

  • ३ मार्च २००४, मला माझ्याच CID मधील सहकाऱ्यांकडून खोट्या केसमध्ये अटक करण्यात आली. त्या अटकेबाबत अजूनही कोणता निष्कर्ष निघालेला नाही
  • मला असं वाटतंय, पुन्हा तसंच काहीतरी होणार आहे 
  • माझेच सहकारी मला खोटया सापळ्यात अडकवीत आहेत
  • मात्र, यावेळी परिस्थितीत किंचित बदल आहे
  • गेल्यावेळी माझ्याकडे आशा, सयंम आणि सेवेची १७ वर्षे होती 
  • मात्र आता माझ्याकडे ना सेवेची १७ वर्षे असतील आणि ना जगण्याचा संयम
  • मला असं वाटतं की, आता या जवळ येणाऱ्या जगाला गुड बाय करण्याची वेळ आली आहे

दरम्यान, हे स्टेटस डिलीट करण्याच्या सूचना वरिष्ठांनी सचिन वाझे यांना दिल्या आहेत. वाझे यांनी काहीही वेगळं पाऊल उचलू नये म्हणून काही अधिकारीही सचिन वाझे यांच्या संपर्कात असल्याचं समजतंय.

mumbai news sachin vaze whatsapp status says time to say good bye to the world

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT